Kalyan News: कल्याणमध्ये 4 मे रोजी राडा होणार? मराठी सक्तीच्या मुद्यावर मनसेचा आक्रमक इशारा

Kalyan News: कल्याणमध्ये मराठी भाषेच्या सक्तीवरून राजकारण चांगलेच तापले असून मनसे आणि काही संघटना समोरासमोर ठाकण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan MNS : कल्याणमध्ये मराठीच्या मुद्यावर मनसे आक्रमक झाले आहे.

Kalyan News: कल्याणमध्ये मराठी भाषेच्या सक्तीवरून राजकारण चांगलेच तापले असून मनसे आणि काही संघटना समोरासमोर ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 4 मे रोजी मराठी सक्तीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे स्टाईलने उत्तर देण्याचा इशारा दिला आहे. यामुळे येत्या काळात कल्याणमधील वातावरण अधिक तणावपूर्ण होण्याची चिन्हे आहेत.

मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक

कल्याणमध्ये मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसेने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. काही संघटनांनी मराठी सक्तीच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली असली तरी, मनसेने याला चोख प्रत्युत्तर देण्याचे ठरवले आहे. मराठी रिक्षा चालकांना कोणी त्रास दिला किंवा मराठी भाषेचा विरोध केला, तर त्यांना मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या संदर्भात मनसेच्या वतीने कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही देण्यात आले आहे.

Advertisement

मराठी रिक्षा चालकांना पाठिंबा देण्यासाठी मनसेने एक नवीन पाऊल उचलले आहे. मराठी चालकांच्या रिक्षांवर विशेष स्टिकर्स लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या माध्यमातून मराठी भाषेचा प्रसार आणि चालकांचे समर्थन केले जाणार आहे. मनसे पदाधिकारी योगेश पाटील यांनी या मोहिमेबाबत माहिती दिली असून, मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी मनसे कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

( नक्की वाचा : ''पानसरेंचं काय झालं माहितीये ना?"; आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला कसं धमकावलं? वाचा संपूर्ण संभाषण )

आरटीओ प्रशासनाकडे ठोस मागण्यांचे निवेदन

 माजी आमदार राजू पाटील यांच्या नेतृत्वाखालील मनसेच्या शिष्टमंडळाने कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) जाऊन प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक सेवा क्षेत्रात मराठीचा वापर अनिवार्य आहे. मात्र, अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालक या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. 

प्रवाशांशी मराठीत संवाद न साधणे आणि वाहनांमध्ये मराठी सूचना फलक न लावणे यामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय होत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

( नक्की वाचा : 36 लाखांची खंडणी उकळल्यानंतरही शांत झाली नाही आग; छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियकराच्या पत्नीवर घरात घुसून वार )

प्रशासकीय कारवाईसाठी मनसेचा अल्टिमेटम

मनसेने प्रशासनाकडे केवळ मराठी भाषेचा मुद्दाच नाही, तर रिक्षा वाहतुकीतील बेशिस्तीवरही बोट ठेवले आहे. रिक्षा-टॅक्सी चालकांची मराठी ज्ञान तपासणी करावी, नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी आणि परवाना नूतनीकरणाच्या वेळी मराठीची अट सक्तीने लागू करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. यासोबतच मीटरप्रमाणे प्रवासासाठी स्वतंत्र लाईन, शेअरिंग रिक्षांचे अधिकृत थांबे आणि प्रवास नाकारणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्याची मागणीही लावून धरली आहे. प्रशासनाने यावर तातडीने पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, योगेश पाटील आणि अरुण जांभळे यांनी दिला आहे.
 

Topics mentioned in this article