कल्याण महानगरपालिका निवडणुकीसाठी उत्साहात मतदान सुरू असताना, कल्याण पूर्व येथील गायत्री शाळेतील* मतदान केंद्रावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमन भालचंद्र गायकवाड या महिला मतदाराचे मत त्यांच्या अनुपस्थितीत कोणीतरी आधीच नोंदवले असल्याचे उघड झाले आहे.
काय घडले नेमके?
सुमन गायकवाड या गुरुवारी दुपारी आपल्या पती आणि मुलासह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गायत्री शाळेतील केंद्रावर पोहोचल्या होत्या. जेव्हा त्या मतदान केंद्रात गेल्या आणि आपली ओळख पटवून दिली, तेव्हा तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, "तुमच्या नावासमोर आधीच मतदानाची नोंद झाली आहे आणि तुमचे मतदान पूर्ण झाले आहे."
(नक्की वाचा- Raj Thackeray: 'पाडू'नंतर मतदानाच्या शाईबाबत राज ठाकरेंचा मोठा आरोप, म्हणाले...)
सुमन गायकवाड यांनी आपण मतदान केलेच नाही, असा पवित्रा घेतला. मात्र, यादीत त्यांच्या नावासमोर 'मार्क' असल्याने त्यांना मतदान करण्यापासून रोखण्यात आले. यामुळे गायकवाड कुटुंबाने प्रशासकीय ढिसाळपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
(नक्की वाचा- BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल उशिरा लागणार? उमेदवारांची धाकधूक वाढली)
कल्याण पूर्वेतही अशीच घटना
कल्याण पूर्वेतील सेंट लुड्स शाळेतील मतदान केंद्रावरही अशी एक घटना घडली आहे. रमेश पवार या मतदाराला मतदान करता आलेले नाही. रमेश पवार यांच्या आधीच कोणीतरी त्यांच्या नावाने मतदान केले. मतदान ओळखपत्र दाखवून मतदान करून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. अधिकाऱ्यांनी रमेश पवार यांना ही माहिती दिली.