अमजद खान
कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसापासून गुन्हेगारी वाढली आहे. रस्त्यावर धिंगाणा करणे, लोकांना मारहाण करणे, नशेखोरांचा आणि बेशिस्त रिक्षा चालकांमुळे नागरिकांना त्रास असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांची आणि पोलिसांची डोकेदुखी वाढली. त्यामुळे कल्याण पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री कल्याण डोंबिवली पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. हे कोंबिंग ऑपरेशन कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे त्यांच्या पुढाकाराने करण्यात आले.
या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरातील मुख्य चौक आणि वादग्रस्त ठिकाणे पिंजून काढले.या ऑपरेशनमध्ये एकूण 240 पोलीस सहभागी होते. या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीत शनिवारी रात्री पोलिसांच्या कोंबिंग ऑपरेशन केले. या दरम्यान रस्त्यावर दारू पिऊन धिंगाणा करणे, बेशिस्त रिक्षाचालक ज्यांचा मुळे वाहतूक कोंडी आणि इतर समस्या उद्भवतात, विना कारण रस्त्यावर फिरणे, नशा करून लोकांना त्रास देणाऱ्यांवर तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले गुंड्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली.
नक्की वाचा - Oil on Navel: नाभीवर तेल लावण्याचे फायदे! योग गुरुंनी सांगितले कोणते तेल उपयुक्त
कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी हे ऑपरेशन राबवले. या ऑपरेशनमध्ये 17 पोलीस निरीक्षक, 40 सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, 236 पुरुष पोलीस कर्मचारी आणि 18 महिला पोलीस सहभागी होते. या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यात परिमंडळ-3 कल्याण हद्दी 21:00 ते 24:00 दरम्यान ऑल आउट ऑपरेशन स्कीम राबविण्यात आली. गुन्हेगारांना आळा बसावा हा या मागचा उद्देश होता.
यात मपोका अंतर्गत 21 कारवाई करण्यात आल्या. तर कोप्ता अंतर्गत 32 कारवाई झाल्या. प्रोहीबीशन अंतर्गत 11 तर ड्रक अँण्ड ड्राइव्ह अंतर्गत 06 कारवाई झाल्या. लॉज चेकिंग ही या कारवाई दरम्यान करण्यात आले. तडीपार आरोपी चेक, नॉन बेलेबल आरोपी चेक, फरारी आरोपी चेक ,नाकाबंदी कारवाई ,पाहिजे असलेले गुंड, हॉटेल चेक, बार चेकिंग, हिस्ट्री सीटर, दारूबंदी, जुगार यावर ही कारवाई करण्यात आली.