जाहिरात

Oil on Navel: नाभीवर तेल लावण्याचे फायदे! योग गुरुंनी सांगितले कोणते तेल उपयुक्त

योग गुरु पंकज शुक्ला यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Video) शेअर करून कोणत्या समस्येसाठी कोणते तेल उपयुक्त आहे, याबद्दल माहिती दिली आहे.

Oil on Navel: नाभीवर तेल लावण्याचे फायदे! योग गुरुंनी सांगितले कोणते तेल उपयुक्त

Benefits of Appling oil on Navel: आयुर्वेदात नाभीचे महत्त्व आहे. नाभीला (Belly Button) शरीराचा एक महत्त्वाचा बिंदू मानले जाते. आयुर्वेद शास्त्रानुसार, नाभीचा संबंध शरीरातील सुमारे 72,000 नाड्यांशी जोडलेला आहे. त्यामुळे, विशिष्ट तेलांचा वापर करून नाभीवर हलका मसाज करणे शरीरासाठी अत्यंत सकारात्मक परिणाम देणारे ठरू शकते. यामुळे अनेक समस्यांपासून आराम मिळतो. याच संदर्भात, योग गुरु पंकज शुक्ला यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ (Video) शेअर करून कोणत्या समस्येसाठी कोणते तेल उपयुक्त आहे, याबद्दल माहिती दिली आहे. कोणते तेल, कशासाठी? विविध शारीरिक तक्रारींवर मात करण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर कसा करावा, हे योग गुरुंनी स्पष्ट केले आहे.

सरसोंचे तेल: 
नाभीवर मोहरीच्या तेलाचा (Mustard Oil) मसाज करणे पचनसंस्थेसाठी (Digestive System) लाभदायी ठरते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि ओठ फाटण्याच्या समस्येवर आराम मिळतो. रात्री झोपण्यापूर्वी 5-7 थेंब नाभीवर लावावेत.

नारळाचे तेल: 
चेहऱ्यावर नैसर्गिक तेज (Glow) आणण्यासाठी नारळाचे तेल (Coconut Oil) उपयुक्त आहे. तसेच, हार्मोनल असंतुलन (Hormone Imbalance) आणि मज्जातंतूंशी (Nerves) संबंधित समस्यांवरही हे तेल गुणकारी ठरते.

बदाम तेल: 
कमकुवत हाडे (Weak Bones) असलेल्या व्यक्तींनी रात्री बदाम तेलाचे (Almond Oil) 5-7 थेंब नाभीवर लावावेत. यामुळे हाडे मजबूत होतात. केस (Hair) निरोगी राहतात आणि स्मरणशक्ती (Memory) वाढण्यास मदत होते.

निंबाचे तेल: 
त्वचेच्या समस्या (Skin Problems), जसे की बुरशीजन्य संसर्ग (Fungal Infection), खाज किंवा पुरळ यांवर निंबाच्या तेलाचा (Neem Oil) मसाज केल्यास आराम मिळतो.

शुद्ध तूप: 
नाभीवर शुद्ध तूप (Ghee) लावण्याचे अनेक फायदे आहेत. विशेषत: निद्रानाश (Insomnia) आणि हार्मोनल असंतुलन दूर करण्यासाठी तसेच हाडे मजबूत करण्यासाठी तुपाचा वापर लाभदायक ठरतो.

हे उपाय वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नसून, अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com