Kalyan News: मनसेचे 'ते' आंदोलन, 2 महिने झाले तरी अहवाल नाही, आता उपासमारीची वेळ, प्रकरण काय?

मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा वायरल होत आहे. या व्हिडिओवर अत्यंत खालच्या थराची कमेंट केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
कल्याण:

अमजद खान 

इंजेक्शन लावून  सफरचंद विकतोस असा आरोप करून एका फळ विक्रेत्याला मनसे कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सफरचंदचा नमुना अन्न व औषध प्रशासनाने घेतला होता. मात्र दोन महिने उलटून गेले तरी त्याचा अहवाल काही दिलेला नाही. त्यामुळे इरफान रहीम या फळ विक्रेत्याचे कुटुंब चिंतेत आहे. सफरचंदचा अहवाल आला तर व्हिडिओ डिलीट करून संबंधित मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई होऊ शकते. व्यावसाय देखील सुरू करता येईल,अशी मागणी फळ विक्रेत्याच्या कुटुंबीयानी केली आहे. 

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात दोन महिन्यांपूर्वी एका फळ विक्रेत्याला मुस्लिम असल्याचे सांगत काही तरुणांनी मारहाण केली. तू इंजेक्शन मारून सफरचंद पिकवतोस. त्यामुळे तुला इथे धंदा करू देणार नाही. असे सांगत मोहम्मद इरफान या फळ विक्रेत्याला मारहाण झाली. त्यानंतर त्याला कोळसेवाडी पोलीस स्टेशनला घेऊन गेले. मात्र पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा गुन्हा होत नसल्याने मोहम्मद इरफानला सोडून दिले. जप्त केलेले सफरचंद औषध विभागाकडे पाठवून दिले. 

Advertisement

नक्की वाचा - Dombivli video: मुलाने खोबरं खाल्लं, म्हणून आईलाच मारलं, बायकांसोबत पुरूषांची ही अमानुष मारहाण

मात्र दोन महिने झाले, अन्न व औषध विभागाने या संदर्भात कोणताही रिपोर्ट दिला नाही. सफरचंदामध्ये इंजेक्शन मारले गेले होते की नाही याची शहानिशा केली नाही. त्याचा अहवाल अजून आला नाही. या संदर्भात मोहम्मद इरफान याची पत्नी शबाना बानू हिने देखील एक पत्र अन्न औषध प्रशासन विभागाला पाठवले आहे. त्यामध्ये तिने लिहिले आहे की 9 डिसेंबर 2025 रोजी सफरचंदाचे नमुने विश्लेषणासाठी घेतलेले होते. मनसे कार्यकर्ते यांनी माझे पती इरफान राहील याच्या महाराणीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये अन्नपदार्थांचा विश्लेषण अहवाल जमा करायचा आहे, तरी कृपया लवकरात लवकर मला विश्लेषणाचा अहवाल द्यावा ही विनंती असं पत्र लिहिलं आहे. 

नक्की वाचा - Trending News:10 लाखांची नोकरी सोडून जर्मनी गाठले!, भारतीय तरुणीने असं पाऊल का उचलले? कारण ऐकून हैराण व्हाल

मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा वायरल होत आहे. या व्हिडिओवर अत्यंत खालच्या थराची कमेंट केली जात आहे. अहवाल दिला तर हा व्हिडिओ डिलीट करायला आम्ही भाग पाडू असे इरफान याच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर त्यांच्या व्यवसायावर ही व्हिडिओचा परिणाम होत आहे. या प्रकरणी शबाना बानो हिने भाजप आमदार सुलभा गायकवाड यांची भेट घेतली. सुलभा गायकवाड यांनी न्यायाची आश्वासन दिले आहे. त्यामुळे आता तरी या फळ विक्रेत्याला न्याय मिळणार का असा प्रश्न आहे. किंवा जर त्याने खरोखर त्या सफरचंदामध्ये इंजेक्शन दिले असतील तर त्याला शिक्षा देण्याचा मार्ग ही मोकळा होणार आहे. त्यासाठी तो अहवाल येण्याची गरज आहे. तो येत नसल्याने या फळविक्रेत्यावर उपासमारीची वेळ आली आहे.