- अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर बहुप्रतिक्षित फ्युनिक्युलर रेल्वे सेवा सुरू झाली
- या रेल्वेने मलंगगडावर जाण्यासाठी लागणारा दोन तासांचा पायी प्रवास फक्त सात मिनिटांत पूर्ण होण्यास मदत होईल
- फ्युनिक्युलर रेल्वेने भाविकांच्या संख्येत वाढ होण्यास आणि पर्यटनाला चालना मिळेल
अमजद खान
Funicular train: अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावरील बहुप्रतिक्षित फ्युनिक्युलर रेल्वे सेवा अखेर सुरू झाली आहे. आमदार किसन कथोरे आणि आमदार सुलभा गायकवाड यांच्या उपस्थितीत फ्युनिक्युलर रेल्वेचा शुभारंभ झाला. या ट्रेनमुळे मलंगगडावर जाण्यासाठी लागणारा 2 तासांचा पायी प्रवास आता अवघ्या 7 मिनिटांवर आला आहे. या ट्रेनमुळे मलंगगडावर येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ होईल. तसेच इथल्या पर्यटनालाही चालना मिळणार आहे. या प्रकल्पाची अनेक वर्षापासून प्रतिक्षा होती. अखेर ते स्वप्न पूर्ण झाले आहे. याचा थेट फायदा भाविकांना होणार आहे.
सुलभा गायकवाड यांच्या मतदार संघात हा प्रकल्प सुरू झाला आहे. देशातील फ्युनिक्युलर रेल्वेचा हा पहिला प्रकल्प आहे असं यावेळी आमदार किसन कथोरे यांनी सांगितलं. हा प्रकल्प वेळेत पूर्ण होवू शकला नाही असं ही ते म्हणाले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाची चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी स्वित्झरलँडच्या याच प्रकल्पाचा अभ्यास केला गेला होता. त्यानंतर तो मलंगगडमध्ये प्रत्यक्षात उतरवला जाणार होता. शेवटी हा प्रकल्प 2026 मध्ये पूर्ण झाला.
फ्युनिक्युलर रेल्वेतून एकाच वेळी 90 प्रवासी एकाच वेळी गडावर जावू शकतात. हा प्रवास अगदी पाच ते सात मिनिटात होतो. टप्प्या टप्प्यानं ही सेवा वाढवणार आहे. एका तासाला 1200 प्रवाशी एकाच वेळी जातील. या सेवेमुळे मलंगगडावर जाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना मोठा दिलास मिळेल. अनेक वर्षाचे हे स्वप्न साकार झालं आहे. मलंगगडावर जाण्यासाठी जवळपास दोन तासांची पायपीट करावी लागत होती. त्यानंतर मलंगगडावर पोहोचता येत होतं. पण आता अगदी सात मिनिटात पोहोचता येणार आहे. हा एक गेमचेंजर प्रकल्प समजला जात आहे.
या रेल्वेतून प्रवास करायचा असेल तर यायचे आणि जायचे पन्नास रुपये द्यावे लागणार आहे. तर 75 वर्षांच्या जेष्ठ नागरिकांनी अर्धे तिकीट द्यावे लागणार आहे. 12 वर्षा खालील मुलांना ही अर्ध तिकीट द्यावं लागणार आहे. हा प्रवास पूर्ण पणे सेफ्टी असल्याचं या रेल्वे चालवणाऱ्या कंपनीने स्पष्ट केले आहे. ही भाविकांसाठी बारा महिने चोविस तास चालू राहाणार आहे. त्यामुळे कधी ही मलंगगडावर जाता येणार आहे हे विषेश आहे.