Kalyan News: 'प्रेम संबंध आहेत मग बोलणं का बंद केलं', दिरानं वहिनीसोबत केलं असं काही की, पोलीस ही चक्रावले

महिलेला 2 मुले असून आरोपीलाही 1 मुलगी आहे. तसेच या संबंधांची कल्पना दोन्ही कुटुंबांना होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान 

प्रेम संबंध आहेत मग बोलणं का बंद केलं अशी विचारणा करत दिरानेच आपल्या वहीनीसोबत भयंकर कृत्य केलं.  कल्याणमध्ये अनैतिक संबंधातून एका महिलेची तिच्याच दिराने डोके भिंतीवर आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला झारखंडमधून अत्यंत नाट्यमयरीत्या अटक केली. पोलिसांना केवळ 20 मिनिटांचा उशीर झाला असता, तर आरोपी नेपाळमध्ये फरार झाला असता, अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 एप्रिल रोजी कल्याण पश्चिमेकडील एका घरातून गुड्डू देवी नावाच्या महिलेला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना 11 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. तपासादरम्यान मृत महिला आणि तिचा दिर बम बम कुमार यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. मात्र, काही दिवसांपासून गुड्डू देवी यांनी बम बम कुमारशी बोलणे बंद केले होते. याच रागातून आरोपीने तिच्या घरी जाऊन वाद घातला. त्यानंतर तिचे डोके भिंतीवर आपटून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर तिथून पळ काढला. 

Advertisement

नक्की वाचा - Shocking: अजब पोलीसांचा गजब तर्क!'गाडीत डिझेल नाही, हरवलेल्या मुलीला शोधता येणार नाही' कुटुंबीयांचा संताप

घटनेनंतर आरोपीचा मोबाईल बंद होता. त्यामुळे त्याचा तपास लागत नव्हता. पोलीसांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. मग पोलीसांनी त्याच्या नातेवाईकांकडून झारखंडमधील मूळ गावाचा पत्ता मिळवला. डीसीपी अतुल झेंडे, एसीपी अशोक होनमाने आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक तयार केलं. त्यानंतर हे पथक झारखंडमधील गोंडा जिल्ह्यात पोहोचले. त्या आधी त्यांनी स्थानिक पोलीसांना याबाबतची माहिती दिली. स्थानिक पोलीसांनी ही कल्याण पोलीसांना मदत केली. 

नक्की वाचा - Shocking Video: दादरमध्ये इडली बनवण्यासाठी शौचालयाचे पाणी? Video व्हायरल होताच मुंबईकरांमध्ये संतापाचा उद्रेक

आरोपीला ही पोलीस आपल्या मागावर आहेत याची कुणकुण लागली होती. त्यामुळे तो नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याच वेळी पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. झारखंडहून त्याला कल्याणला आणण्यात आले आहे. त्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले.  न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिकारी भूषण देवरे पुढील तपास करत आहेत. मृत महिलेला 2 मुले असून आरोपीलाही 1 मुलगी आहे. तसेच या संबंधांची कल्पना दोन्ही कुटुंबांना होती.