Kalyan News: KDMC मध्ये मनसेला गटनेतेपद नाहीच! मनसेला धक्का की, मनसेचीच खेळी?

आता या तिन्ही समितीमध्ये मनसेला प्रतिनिधीत्व मिळते की नाही ? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना, भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी युती असून महापालिकेचे प्रमुख पदे विभागली गेलीत
  • कोकण विभागीय आयुक्तांनी मनसेला शिवआघाडीत सहभागी असल्यामुळे गटनेतेपद नाकारले आहे
  • शिवसेना शिंदे गटाचा गटनेतेपदी विश्वनाथ राणे निवडले गेले असून मनसेला शिवआघाडीतील गटनेतेपद दिले जाणार नाही
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
कल्याण:

अमजद खान 

केडीएमसीत शिवसेना आणि भाजपमध्ये परत तणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. कोकण विभागीय आयुक्तांनी महापालिका गटनेत्या संदर्भात पाठविलेल्या पत्रात मनसेच्या गटनेत्याचा उल्लेख होता. आत्ता पुन्हा एक पत्र कोकण विभागीय आयुक्तांनी पाठवले आहे. त्यामध्ये मनसे हा शिवआघाडीत सहभागी आहे. त्यामुळे त्यांचा महापालिकेत गटनेता होऊ शकत नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे हा मनसेला धक्का आहे की, मनसेचीच ही खेळी आहे ? अशी चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात काही तर्क लावले जात आहेत. भाजपने काही दिवसापूर्वी स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते पदाची मागणी केली होती. त्यानंतर शिवसेना आणि मनसे एककत्रित राहावे अशी चर्चा सुरू झाली. हे करत असताना मनसेने गटनेतेपदाचा त्याग केला आहे का? याची ही चर्चा रंगली आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना, भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती आहे. शिवसेनेचा महापौर तर उपमहापौरपद भाजपकडे आहे. आता स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेता या दोन मोठ्या पदांकरीता चर्चा सुरु आहे. या संदर्भात भाजप नेत्यांनी बैठक घेतली. त्यात या दोन्ही पदावर दावा ठोकला आहे. त्यानंतर शिवसेना भाजपच्या या मागणीचा विचार करणार का असा सवाल उपस्थित झाला होता. मात्र शिवसेनेच्या गटाचे संख्याबळ पाहता, शिवसेना शिंदे गट आरामात स्थायी समिती सभापतीपदी आपला सदस्य बसवू शकतो. 

नक्की वाचा - Trending News: 10,20 आणि 50 रुपयांच्या नोटांसंदर्भातील मोठी बातमी! सरकारनं या नोटांबाबत काय सांगितलं?

शिवआघाडीत एकूण 59 नगरसेवक आहेत. ठाकरेंच्या तीन नगरसेवकाचा अप्रत्यक्ष पाठिंबा या आघाडीला आहे. त्यानंतर ही संख्या 62 होते. त्यामुळे स्थायी समितीत शिवसेना शिंदे गट आणि मनसेचे वर्चस्व राहणार आहे. कोणता दगा फटका होऊ नये यासाठी मनसेने ही खेळी केली याची चर्चा आहे. महापालिकेची निवडणूक पार पडली.  निकाल लागला. त्यानंतर महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. भाजपने 50 नगरसेवकांचा गट स्थापन केला. तर शिंदे सेनेचे 53, मनसेचे 5 आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 1 असा एकूण 59 नगसेवकांचा शिवआघाडीचा एक गट स्थापन झाला. उद्धव सेनेने 8 नगरसेवकांचा गट स्थापन केला. काँग्रेस पक्षाने 2 सदस्यांचा गट स्थापन केला. गट स्थापनेच्या सुरुवातीलाच मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा दिला. प्रत्येक पक्षाने गटनेतेही निवडले गेले. भाजपने शशिकांत कांबळे, शिंदे सेनेने विश्वनाथ राणे, उद्धव सेनेने उमेश बोरगांवकर आणि काँग्रेसचे कांचन कुलकर्णी यांना गटनेते निवडले. 

नक्की वाचा - Buldana News: शिक्षक पत्नीला का मारलं? नवऱ्याच्या चौकशीनंतर प्रकरणात ट्वीस्ट, सत्य समोर येताच सर्वच हादरले

मनसेने प्रल्हाद म्हात्रे यांना गटनेते पद दिले. आत्ता शिवआघाडीचा गट स्थापन झाल्याचे पत्र कोकण विभागीय आयुक्तांनी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना पाठविले. शिवआघाडीत सहभागी असलेल्या शिंदे सेना, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्यापैकी कोणत्याही एका नगरसेवकाला गटनेतेपदी राहता येईल. त्यानुसार शिंदे सेनेने गटनेतेपदी राणे यांची निवड केली आहे. त्यामुळे शिव आघाडीत सहभागी झालेल्या मनसेला गटनेते पद देता येणार नाही. शिवआघाडीमुळे मनसेचे गटनेतेपद बाद झाले आहे. त्यामुळे या पुढे मनसेला शिंदे सेनेच्या शिवआघाडी गटाच्या नेत्याचा पक्षादेश पाळावा लागणार आहे.16 मार्च रोजी महापालिकेची महासभा आहे. या महासभेत स्थायी समितीचे 16, महिला बाल कल्याण आणि शिक्षण समितीचे प्रत्येकी 11 सदस्य नियुक्त केले जाणार आहे. मनसेने गटनेते पदावर पाणी सोडावे लागले. आता या तिन्ही समितीमध्ये मनसेला प्रतिनिधीत्व मिळते की नाही ? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement