जाहिरात

Buldana News: शिक्षक पत्नीला का मारलं? नवऱ्याच्या चौकशीनंतर प्रकरणात ट्वीस्ट, सत्य समोर येताच सर्वच हादरले

त्याच वेळी त्याने वृषालीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने तीन वेळा वृषाली यांना विष प्रयोग करुना मारण्याचा प्रयत्न केला होता.

Buldana News: शिक्षक पत्नीला का मारलं? नवऱ्याच्या चौकशीनंतर प्रकरणात ट्वीस्ट, सत्य समोर येताच  सर्वच हादरले
बुलडाणा:

अमोल सराफ

शिक्षक पत्नीला मारण्यासाठी पतीनेच तीनवेळा प्लॅन केला होता. पण ती प्रत्येक वेळी वाचली. मात्र त्यानंतर एका अपघातात तिचा मृत्यू झाला. पण हा अपघात नसून तो एक खून होता हे चौकशीत स्पष्ट झालं आहे. वृषाली गावंडे असे मृत शिक्षिकेचं नाव होतं. तिचा खून तिच्या पतीनेच एका लाखाची सुपारी देवून केला होता. पण सर्वांसमोर एकच प्रश्न होता की हा खून तिच्या पतीने का केला? यामागे काही लव्ह अफेअरची भानगड होती का? अनैतिक संबंधाचा अँगल होता का? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र जळगाव जामोद पोलीसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. शिवाय हा खून का केला हे ही शोधून काढले आहे. हे सत्य सर्वांनाच हादरवून सोडणारे आहे. 

वृषाली गावंडे या जिल्हा परिषदेवर शिक्षिका होत्या. त्यांचे लग्न प्रकाश गावंडे याच्यासोबत झाले होते. त्यांना एक मुलगा ही होता. मात्र वृषाली यांना सासरच्या मंडळींकडून जाच होत होता. पती प्रकाश वारंवार चारचाकी गाडीची मागणी करत होता. सोन्याचे दागिने आणि पैशाचाही तगादा लावला होता. यातून वृषाली यांचा  सतत मानसिक छळ केला जात होता. त्यांनी शेवटी या विरुद्ध आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पती विरोधात पोलीसात थेट तक्रार दाखल केली. ही गोष्ट पती प्रकाश याला आवडली नाही. 

नक्की वाचा - Buldhana Crime: तीनवेळा प्लॅन, तरीही बायको वाचली! शेवटी नवऱ्याचा भयंकर कट, शिक्षिकेला थंड डोक्याने संपवलं

त्याच वेळी त्याने वृषालीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने तीन वेळा वृषाली यांना विष प्रयोग करुना मारण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात त्याला यश आलं नाही. शेवटी त्याने अपघाताचा बनाव रचला. यासाठी त्याने मनीष सुर्यवंशी याला एक लाखाची सुपारी दिली. त्याने त्याच्या गाडीने वृषाली यांना जोरदार धडक दिली. हा अपघात असल्याचं ही दाखवलं. त्यात वृषाली यांना जागीच मृत्यू झाला. मात्र चौकशीसाठी मनीष याला ताब्यात घेतल्यानंतर खरं सत्य समोर आलं. मनीषने या थरारक कटाची कबुली दिली. हा अपघात नव्हता तर वृषालीच्या पतीनेच एका साधिदारासह रचलेला हत्येचा कट होता. 

नक्की वाचा - Attack on police: भांडण सोडवायला गेला, त्याचाच राग मनात धरला, 15 जणांचा पोलीसावर लोखंडी गजाने हल्ला

मात्र त्याने ही हत्या का केली असा प्रश्न होता. या प्रकरणी प्रकाश आणि त्याच्या साधीदाराला अटक  करण्यात आली आहे. पोलीसांनी प्रकाशला पोलीसी खाक्या दाखवला. त्यानंतर त्याने ही गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलीसांकडे पत्नीने दिलेली तक्रार त्याला पटली नव्हती. त्यातून त्याने हे कृत्य केले. शिवाय  वृषाली यांचा भाऊ सुमित डोसे यांनी देखील आपल्या जबाबात बहिणीकडे आर्थिक मागणी दिवसें-दिवस वाढत चालली होती असं सांगितलं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com