Kalyan News: 7 दिवसांच्या मुलीला कचऱ्यात फेकलं, कुत्र्यांनी बाळा भोवती कडं केलं, हल्ला करणार तेवढ्यात...

सध्या मुलीची प्रकृती स्थिर आहे. बाळाला काही काळ निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे असं ही डॉक्टरांनी सांगितलं.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • कल्याण पूर्वेतील कचरा कुंडीत एका नवजात मुलीला प्लास्टिकच्या पिशवीत टाकले गेले होते
  • स्थानिक शिक्षिका पूजा लावेकर यांनी मुलीला वाचवून ताब्यात घेतले
  • महापालिकेच्या रुग्णालयात मुलीवर उपचार सुरू असून डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर आहे असे सांगितले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
कल्याण:

अमजद खान 

बेटी बचाव ही मोहीम देशभर सुरू आहे. पण आज ही अनेक लोकांना ती नकोशीच आहे. जनजागृती आणि प्रबोधनानंतर ही मुलींना जन्मताच टाकून दिले जाते किंवा त्यांना संपवलं जातं. याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. असचं एक धक्कादायक उदाहरण कल्याणमध्ये समोर आलं आहे. कल्याण पूर्वेला एका कचरा कुंडीत एका चिमुकलीला फेकून देण्यात आलं होतं. तिला एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरलं होतं. या चिमुकलीच्या भोवती कुत्रेही गोळा झाले होते. मात्र त्याच वेळी तिथल्या स्थानिक असलेल्या पुजा लावेकर यांनी ते पाहीलं. त्यांनी त्या मुलीला आपल्या घरी आणले. त्यामुळे चिमुकलीचा जीव वाचला. 

पूजा लावेकर या कल्याण पूर्वेला राहातात. त्या शाळेत काम करतात. सकाळच्या सुमारास त्या कचरा टाकण्यासाठी गेल्या होत्या. पिंपळाच्या झाला शेजारी कचरा कुंडी आहे. त्यामुळे त्या तिथे गेल्या. त्याच वेळी त्यांना एक प्लास्टिकची पिशवी दिसली. ती हलत होती. शिवाय कुत्रे ही तिथे भूंकत होते. त्याच वेळी पिशवीतून बाळाचे डोके बाहेर पडले. त्यांनी ते पाहीले. त्यांनी क्षणाचा ही विलंब नकरता त्या बाळाला आपल्या ताब्यात घेतले. तिथे जमलेल्या कुत्र्यांना हाकलले. ते हल्ला करण्याच्या तयारीत होते. त्यामुळे त्यांनी बाळाला आपल्या घरी नेले. 

Advertisement

नक्की वाचा - Nanded News: चक्क वाहनाच्या उजेडात पोस्टमॉर्टम! नायगावच्या रुग्णालयातील फोटो व्हायरल, प्रशासन म्हणतं हे तर...

घरी गेल्यानंतर त्या सर्वांना बाळा बद्दल सांगणार होत्या. त्यांनी घरातल्या आणि अजूबाजूच्या लोकांना याची माहिती दिली. तातडीने स्थानिकांनी हीबाब पोलीसांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी त्या बाळाला ताब्यात घेतलं. शिवाय उपचारासाठी बाळाला महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. तिथे बाळावर उपचार करण्यात आले.  डॉक्टरांच्या माहितीनुसार, सध्या मुलीची प्रकृती स्थिर आहे. बाळाला काही काळ निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे असं ही डॉक्टरांनी सांगितलं. 

नक्की वाचा - Sachin Tendulkar: सचिन खेळला विमानात क्रिकेट, लेकी- सुनेनं केली बॉलिंग, विकेट कुणी घेतली? पाहा Video

बाळाची नाळ पाहीली असता ते सात दिवसाचं असावं असं ही डॉ सुलोचना त्रिभुवन यांनी सांगितलं. बाळाची तब्बेत ठणठणीत असल्याचं ही त्या म्हणाल्या. दरम्यान या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या नवजात मुलीला कचरा कुंडीत कोण टाकून गेलं याचा शोध पोलिस घेत आहे. त्यासाठी परिसरातले सीसीटीव्ही पाहीले जात आहे. त्यातून पोलिसांना काही लिड मिळते का ते पाहात आहे. बाळाला टाकणारा समोर आल्यानंतरच त्याने हे कृत्य का केले हे समोर येईल.