जाहिरात

Sachin Tendulkar: सचिन खेळला विमानात क्रिकेट, लेकी- सुनेनं केली बॉलिंग, विकेट कुणी घेतली? पाहा Video

हा क्रिकेटचा सामना अगदी हलक्याफुलक्या वातावरणात होताना दिसत आहे.

Sachin Tendulkar: सचिन खेळला विमानात क्रिकेट, लेकी- सुनेनं केली बॉलिंग, विकेट कुणी घेतली? पाहा Video

सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट यांचे अनोखे नाते आहे. सचिन आणि क्रिकेट म्हणजे दो जिस्म एक जान म्हणावे लागेल. सचिन जरी क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याचे क्रिकेट प्रेम तसूभर ही कमी झाले नाही. ज्यावेळी संधी मिळते त्यावेळी तो क्रिकेट खेळताना दिसतो. मग तो कुठे फिरायला गेला असेल तर रस्त्यावरील मुलांसोबत ही तो क्रिकेट खेळताना दिसला आहे. तर कधी तो काश्मीरमध्ये जवानांसोबतही क्रिकेट खेळताना पाहीला आहे. आता त्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात तो  त्याची लेक सारा आणि सून सानिया चांडोक सोबत क्रिकेट खेळत आहे. पण हा क्रिकेटचा डाव कोणत्या मैदानात नाही तर चक्क विमानात रंगला आहे. 

सचिननं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर क्रिकेट खेळतानाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याची कॅप्शन मजेशीर आहे. तो लिहीतो कितीही उंचीवर असो दुष्टीकोन बदलला नाही पाहीजे. हे एक प्रायव्हेट फ्लाईट आहे. या फ्लाईटमध्ये सचिन तेंडुलकर, मुलगी सारा तेंडुलकर आणि सून सानिया चांडोक तेंडुलकर दिसत आहे. यात सचिन बॅटींग करत आहे. त्याच्या हातात बॅट आहे. तर त्याला बॉलिंग त्याची सुन सानिया करत आहे. फिल्डींगची जबाबदारी सारावर आहे. ती विमानात बसून फिल्डींग करत आहे. 

नक्की वाचा - Smriti Mandhana: भर मैदानात मासिक पाळी आली, अंगावर सफेद ड्रेस अन् स्मृती मानधनाची अडचण, पुढे जे घडलं ते...

सचिन बॅटींग करताना तुम्ही मला कधीच आऊट करू शकत नाही असं सांगतो. त्यात तो बॅटींग करतो. त्यावेळी एक झेल त्याची लेक सारा सोडते. त्यावर तुम्ही मला आऊट करून दाखवा असं आव्हान सचिन देत आहे. जर मी उलट्या बॅटने खेळलो तर कुठे तुम्ही मला आऊट करू शकता. तशी संधी तुम्हाला आहे असं ही तो सांगताना दिसत आहे. त्यानंतर सानिया पुन्हा एकदा बॉल टाकण्यासाठी सज्ज होते. यावेळी मात्र सारा आपल्या वडीलांचा कॅच पकडण्यात यश मिळवते. आणि सासऱ्याची विकेट घेण्यात सानियाला यश येतं. दोघी ही सचिनला आऊट केल्याच जल्लोष विमानातच करतात. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

नक्की वाचा - Video: 12 बॉलमध्ये 10 रन्सची गरज, त्यानंतर 5 बॉलमध्ये 3 विकेट! श्वास रोखून धरणारी मॅच, पाहा Video

हा क्रिकेटचा सामना अगदी हलक्याफुलक्या वातावरणात होताना दिसत आहे. तिघांची ही चेष्ठा मस्करी सुरू आहे. सारा खेळा दरम्यान हसताना दिसत आहे. तर सचिन सूनेसोबत लेकीला ही आऊट करून दाखवा असं आव्हान देताना दिसत आहे. सून सानिया सासऱ्यांना आऊट करण्यासाठी गंभीर दिसते. बॉलिंगची जबाबदारी ही तिने स्वत:कडेच घेतली होती. या व्हिडीओवर अनेक कमेंट आल्या आहेत. शिवाय सचिनच्या चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस या व्हिडीओवर पाडला आहे. 
 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com