अमजद खान, कल्याण
सुट्ट्या पैशांच्या वादातून महिला क्लार्कला मारहाण झाल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकात घडली आहे. रोशना पाटील असे मारहाण झालेल्या महिला तिकीट क्लार्कचे नाव आहे. मारहाणीनंतर रोशना पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अन्सार शेख नावाच्या तरुणाला कल्याण जीआरपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
( 'NDTV मराठी' चं Youtube चॅनेल सब्सक्राईब करा )
शुक्रवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकातील फूट ओव्हर ब्रिजवर असलेल्या तिकीट काऊंटर समोर एक सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी लोकांना तिकीट काढून देतो. त्याठिकाणी एक तरुण आला. त्याने या व्यक्तीकडे तिकट मागितले. मात्र त्यानंतर दोघांमध्ये सुट्ट्या पैशावरुन वाद झाला. हा व्यक्ती सुट्ट्या पैशाकरता तिकीट काऊंटरच्या दिशेने गेला.
(नक्की वाचा- तीन मित्रांना पत्नीच्या बेडरूममध्ये पाठवलं अन्..., पुण्यातील उच्चशिक्षित कुटुंबातील लज्जास्पद घटना)
त्याठिकाणी पाच रुपयांच्या सुट्ट्या पैशांवरुन या तरुण प्रवाशाचा महिला तिकीट क्लार्क रोशना पाटील हिच्यासोबत वाद झाले. या वादानंतर अन्सार शेख नावाच्या तरुणाने महिल तिकीट क्लार्क रोशना पाटील यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना घडली तेव्हा एफओबीवरील फेरीवाल्यांनीही याठिकाणी गोंधळ घातला.
(नक्की वाचा - Pune Crime : बोपदेव अत्याचार प्रकरणातील दुसरा आरोपी ताब्यात, प्रयागराज येथून अटक)
घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. एकीकडे महिला तिकीट क्लार्कला मारहाण तर दुसरीकडे फेरीवाल्यांचा गोंधळ ही परिस्थिती पाहता नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. महिला क्लार्क रोशना पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तिकीट क्लार्क अश्वीनी शिंदे यांनी या घटनेनंतर आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी केली. तसेच फेरीवाले स्टेशन परिसरात बसून धंदा करतात. त्याची दादागिरी सुरु असते. त्याला कसा आळा घालणार असेही काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले.