Kayaking in Konkan : कोकणातही कायाकिंगची धमाल! ओपन सफारी, कांदळवन सफारीची मजा लुटता येणार

येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असून आपल्या पायांसाठी “फिश मसाज” हा पूर्णपणे मोफत करता येतो.

जाहिरात
Read Time: 2 mins

Sindhudurg News : सध्या सिंधुदुर्गात पर्यटनाचा हंगाम जोरात सुरू असून वेंगुर्ला, मालवण आणि देवगड या तालुक्यातील पर्यटनस्थळी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. सिंधुदुर्गात येणारे पर्यटक प्रामुख्याने समुद्रातील वॉटर स्पोर्ट्सची मजा लुटत असताना वेंगुर्ला तालुक्यातील खवणे येथे मागील दोन वर्षात 'कायाकिंग' हा पर्यटनाचा नवीन ट्रेंड पुढे आला आहे. यामध्ये खाडीपात्रात पर्यटकांना कांदळवन सफारी, बोटींग, खाडीतील जैवविविधता अनुभवता येते. या नवीन “कायाकिंग” ट्रेंडमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला मोठी चालना मिळत आहे.

वेंगुर्ला तालुक्यात खवणे खाडीपात्रात सुरू झालेला “कायाकिंग” हा पर्यटन सफरचा प्रकार सर्वोत्तम आहे. येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असून आपल्या पायांसाठी “फिश मसाज” हा पूर्णपणे मोफत करता येतो. खवणे बीचवरील कायाकिंगची माहिती रिल्सवरून आम्हाला मिळाली होती. त्यानुसार आम्ही मित्र आणि कुटुंबासह आलो आहोत. येथे ओपन सफारी, कायाकिंग, कांदळवन सफारीची मजा लुटली. कायाकिंगचा अनुभव पहिल्यांदाच घेतला आणि तो फार छान होता.

नक्की वाचा - Navi Mumbai : बंद दार, घरात एकटी महिला, नराधमाने झोपेतच झडप घातली; नवी मुंबई हादरली

    खवणे खाडीपात्रात दोन वर्षांपूर्वी हा पर्यटन व्यवसाय आम्ही सुरू केला. आता देशी आणि विदेशी पर्यटकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून दिवाळी आणि ख्रिसमस कालावधीत त्यांची संख्या अधिक असते. या 'कायाकिंग' राईडमध्ये कांदळवन सफारी, बोटींग, विविध पशुपक्षी, खाडीतील जैवविविधता पाहता येते. मुख्य म्हणजे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लाईफ जॅकेट पुरविली जातात.
     

    Advertisement
    Topics mentioned in this article