Kalyan News: महापौरपदाच्या आरक्षण सोडतीसाठी एक दिवस शिल्लक असताना सर्वच महापालिकांमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतही सत्तास्थापनेसाठी अनेक घडामोडी घडू लागल्या आहेत. कल्याण-डोंबिवलीत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. तसं यश देशील शिवसेनेला इथे मिळताना दिसत दिसत आहे. शिवसेनेच्या 53 नगरसेवकांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला असून, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) पाठिंबा दिला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या या खेळीने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट झाले आहे. महायुतीमधील शिवसेनेने 53 नगरसेवकांचा आपला अधिकृत गट स्थापन केला असून, त्यांना मनसेच्या 5 नगरसेवकांनी साथ दिल्याने महायुतीचे पारडे जड झाले आहे.
राजकीय समीकरणांची जुळवाजुळव
शिवसेनेच्या 53 नगरसेवकांचा एकत्र गट स्थापन केला आहे. तर मनसेने 5 नगरसेवकांचा वेगळा गट स्थापन करून शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला.
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी याबाबत म्हटलं की, कल्याण-डोंबिवलीतील शिवसेनेच्या 53 नगरसेवकांनी आपला गट स्थापन केला आहे. मनसेही 5 नगरसेवकांचा गट स्थापन करण्यासाठी आले आहेत. मनसेने आपले समर्थन शिवसेनेला दिले आहे.
(नक्की वाचा- Mumbai Mayor News: ठाकरेंच्या या 2 नगरसेवकांवर सत्ताधाऱ्यांची नजर; काय आहे कारण?)
जितके लोक सोबत येतील त्यांचे स्वागत करू- श्रीकांत शिंदे
युतीमध्ये भाजप-शिवसेना लढलो होतो. युतीचीच सत्ता कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत असेल. सत्ता स्थापनेसाठी नाही, पण स्थिरतेसाठी जितके लोक सोबत येतील त्यांचे स्वागत करू. राजू पाटील माझे मित्र आहेत, विकासामध्ये सगळ्यांनी एकत्र असले पाहीजे यासाठी त्यांनी महायुतीला समर्थन दिले आहे, असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं. महापौर, उपमहापौर आणि समितीच्या अध्यक्षपदासंदर्भातील निर्णय एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण मिळून घेतील, असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- मुंबईत उभारले जाणार 30 मजली 'बिहार भवन'; जागा आणि बजेटही ठरले)
भाजपला बाजूला ठेवून काहीही होणार नाही- श्रीकांत शिंदे
कल्याण-डोंबिवली असो अथवा उल्हासनगर महायुतीचाच महापौर बसेल. तुम्हाला जे वाटतं आहे की भाजपला बाजूला ठेवून काहीतरी होईल, तसे अजिबात होणार नाही. कल्याण-डोंबिवलीमध्ये महायुती आणि मनसे मिळून सत्ता स्थापन करू. उल्हासनगरमध्ये देखील शिवसेना, भाजप, वंचितने आधीच समर्थन दिलं आहे, साई पार्टी आणि अपक्ष मिळून सत्ता स्थापन करणार आहोत. विकासासाठी ठाकरेंच्या नगरसेवकांना पाठिंबा द्यायचा असेल तर त्यांनीही द्यावा, असंही श्रीकांत शिंदे यांंनी म्हटलं.