सर्वात महागडया इमारती मात्र आग विझविण्यासाठी KDMC कडे यंत्रणाच नाही

कल्याणमधील उच्चभ्रू वर्टेक्स सॉलिटीयर या इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर आग लागली. आगीने रौद्र रुप धारण केले. बघता बघता ही आग 3 मजल्यावर पसरली.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याणमधील उच्चभ्रू वर्टेक्स सॉलिटीयर या इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर आग लागली होती.
कल्याण:

अमजद खान, प्रतिनिधी

कल्याणमधील उच्चभ्रू वर्टेक्स सॉलिटीयर या इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर आग लागली होती. आगीने रौद्र रुप धारण केले. बघता बघता ही आग 3 मजल्यावर पसरली. त्यात त्याठिकाणचे फ्लॅट आगीत जळून खाक झाले.

केडीएमसीच्या अग्नीशमन विभाग ही आग वेळेवर विझविण्यात अपयशी ठरला. कारण त्यामध्ये यंत्रणा नव्हती. जी 50 मीटरची शिडी बंद पडली होती. या सर्व प्रकारामुळे कल्याण-डोंबिवलीकरांमध्ये  प्रचंड नाराजी आहे. आग कशामुळे लागली याचा शोध घेतला जाणार आहे. मात्र, महापालिका काेट्यावधी रुपये खर्च करते. त्या अग्नीशमन विभागाच्या अधिकारी जबाबदारी व्यक्ती विरोधात केडीएमसीआयुक्त कारवाई करणार का असा प्रश्न कायम आहे. या इमारतीमध्ये केडीएमसीच्या शहर अभियंत्याचे घर आहे. त्यांचे देखील नुकसान झाले आहे. 

( नक्की वाचा : मुंबईत झाली सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट? 1 महिना वॉट्सअप कॉलवर ठेवलं LIVE अन् लुटले तब्बल... )
 

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरात वर्टेक्स सॉलिटीयर इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर पाऊणे सहा वाजताच्या सुमारास आग लागली. ज्या घरात ही आग लागली. त्या घरात तरुण झोपला होता. आग लागताच तो खाली पळला. थोड्याच वेळात आगीने रौद्र रुप धारण केले. अग्नीशन दल आणि पोलिस घटना स्थळी रवाना झाले.

आग लागल्यामुळे अनेक लोक भयभीत झाले. काही लोक आडकले होते. आजूबाजूच्या परिसरात काम करणारे तरुण आणि पोलिस लोकांच्या मदतीसाठी धावले. पोलिस अधिकारी नामदेव व्हटकर त्यांच्या सोबत इंजिअर पंकज हरड आणि अनिकेत भालेराव इमारतीच्या मजल्यावर पोहचले. 12 व्या आणि 13 व्या मजल्यावर अडकलेल्या लोकांना त्यांनी बाहेर काढले थाेड्यात वेळात आगीने भीषण रुप धारण केले. 15 व्या मजल्यावरील आग 16 आणि 17 व्या मजल्यावर पोहचली. 

Advertisement

या आगीत मोठे नुकसान झाले. आगीचे कारण समजू शकले नाही. आग विझविण्यासाठी यंत्रणा कमी पडत होती. यावेळी रहिवासियांनी तीव्र संताप व्यक्त केला. केडीएमसी आग विझविण्यासाठी 50 मीटरची उंच शिडी अनेक दिवसांपासून बंद आहे अग्नीशमन दलाच्या गाड्या आल्या. उंच पर्यंत पाण्याचा फवारा पोहचत नव्हता. रात्री साडे आठ वाजेपर्यंत आग विझली नव्हती. आग घटना पाहण्याकरीता बघ्यांनी एकच गर्दी केली होती. त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना बरीच कसरत करावी लाहली. 
 

Topics mentioned in this article