जाहिरात

Kalyan News: रुक्मिणीबाई रुग्णालयातला आणखी एक धक्कादायक प्रकार समोर, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

तसे न झाल्यास काही तरी मोठा प्रकार होण्याची भीती ही काहींनी व्यक्त केली आहे.

Kalyan News: रुक्मिणीबाई रुग्णालयातला आणखी एक धक्कादायक प्रकार समोर, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
कल्याण:

अमजद खान

डॉक्टर आणि नर्स मारहाण प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये रुग्णालयाच्या परिसरात तसेच आत भटकी कुत्री मुक्तपणे फिरताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या भटक्या कुत्र्यांना कुणा आवरणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्णालयाच्या बाहेर नाही तर थेट आत या कुत्र्यांचा वावर होत आहे. 

रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही कुत्री कधीही हल्ला किंवा चावा घेऊ शकतात, अशी भीतीही अनेकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालय परिसरात भटक्या कुत्र्यांना  रोखण्यासाठी काही तरी उपाय योजना करणे गरजेचे आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी तरी केडीएमसी प्रशासनाने काही तरी करावे अशी मागणी होत आहे. 

नक्की वाचा - Kalyan News: 'तडीपार करा पण मला जेलमधून बाहेर काढा',मारकुटा रमेश म्हात्रे कोर्टात असं का म्हणाला?

रुक्मीणीबाई रुग्णालय काही ना काही कारणाने चर्चेत असतं. कधी इथं रुग्णांची हेळसांड होते, तर कधी उपचार देण्यात दिरंगाई होते. कधी तर रुग्णांना बराच वेळ वेटींगवर ठेवलं जातं. या आणि अशा अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यात आता कुत्र्यांचा मुक्त वावार यामुळे हे हॉस्पिटल चर्चेत आले आहे. हे भटके कुत्रे कधी ही हल्ला करू शकतात. त्यामुळे इथं येणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे.रुग्णालय प्रशासन आणि केडीएमसीने याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. तसे न झाल्यास काही तरी मोठा प्रकार होण्याची भीती ही काहींनी व्यक्त केली आहे. 

नक्की वाचा - Pune News: पार्थ पवारांच्या साखरपुड्याचं निमंत्रण कुणा-कुणाला? पाहुण्यांची यादी आली समोर, शरद पवारांना...

काही दिवसांपूर्वी केडीएमसीच्याच रुग्णालयात नगरसेवक रमेश म्हात्रे यांने डॉक्टर आणि नर्सना मारहाण केली होती. त्यावेळी ही कल्याण डोंबिवली महापालिकेने ठाम भूमीका घेतली नव्हती. त्यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली. रुग्णालय महापालिकेचे असताना ही भूमीका का घेतली गेली नाही असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे आपल्या रुग्णालयांकडे लक्ष आहे की नाही अशी विचारणा होत आहे. आता कुत्रे रुग्णालयात फिरत आहेत. त्यावर ही उपाय योजना होणार की नाही हे पाहावे लागणार आहे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com