Dr. Sejal Pawar: स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरेच्या वादग्रस्त शोची देशभरात चर्चा सुरू असतानाच, आता मुंबईतील एक डॉक्टर याच शो मुळे अडचणीत आली आहे. डॉ. सेजल पवार असे या तरुणीचे नाव असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणूनही ओळखली जाते. प्रणीत मोरेच्या शोमध्ये प्रेक्षकांमध्ये बसून तिने वैद्यकीय संशोधनाशी संबंधित एका अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक विषयावर हसत-हसत संतापजनक वक्तव्य केलं होतं.
या गंभीर प्रकारानंतर मुंबईच्या प्रसिद्ध केईएम हॉस्पिटलने (KEM Hospital) तिच्याविरुद्ध थेट चौकशीचे आदेश जारी केले असून उद्यापर्यंत या प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर करण्याचे फर्मान सोडले आहे.
कोण आहे सेजल पवार?
डॉ. सेजल पवार ही मुंबईच्या प्रसिद्ध केईएम हॉस्पिटलमधील डॉक्टक. सोबतच सोशल मीडियावर तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. प्रणीत मोरेच्या एका शोमध्ये तिने प्रेक्षक म्हणून हजेरी लावली होती. या शोदरम्यान प्रणीतशी संवाद साधताना तिने सांगितले की, कॉलेजमध्ये मेडिकल रिसर्च आणि मानवी शरीराच्या अंतर्गत रचनेचा अभ्यास करण्यासाठी (डिसेक्शन) जे पुरुषांचे मृतदेह दान केले जातात, त्या मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्सकडे पाहून ती आणि तिच्यासोबतचे इतर मेडिकलचे विद्यार्थी मस्करी करायचे आणि त्यावर जोक्स मारायचे. एका डॉक्टरकडून मृतदेहांचा असा अनादर आणि थट्टा केली जात असल्याचे ऐकून स्वतः प्रणीत मोरेनेही आश्चर्य व्यक्त केले होते.
( नक्की वाचा : 370 रुपयांची बिर्याणी वादात प्रणीत मोरेचा आणखी एक Video Viral,पाहा वैभव सूर्यवंशीला कशी दिली होती वागणूक? )
शोमधील तो धक्कादायक संवाद जसाच्या तसा
व्हायरल व्हिडिओमध्ये प्रणीत मोरे सेजलला विचारतो की, अरे तू डॉक्टर आहेस की कसायी? आणि तुम्ही लोक तिथे गेल्यावर खरोखर असे जोक्स मारता की सिरीयस राहता? यावर सेजल हसत उत्तर देते की, हो आम्ही जोक्स मारतो. यावर प्रणीत म्हणतो की, तुम्ही असे जोक्स मारत असाल ना की या मृतदेहाच्या डोक्यात काहीच नाही. त्यावर पुढे बोलताना सेजल अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी करत म्हणते की, जे काही असेल ते... प्राईज आणि साईझ वगैरे.
सेजलचे हे उत्तर ऐकून प्रणीत मोरेही चक्रावून जातो आणि विचारतो की, काय? तुम्ही लोक मृतदेहांच्या या गोष्टींवरही तिथे चर्चा करता? हा व्हिडिओ समोर आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातून आणि सर्वसामान्य नागरिकांमधून सेजल पवारवर अत्यंत तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला जात आहे.
A female doctor said that when a dead body comes into the hospital, she and her friends joke about his dick size.
— ︎ ︎venom (@venom1s) June 10, 2026
But there is no outrage over that. She won't be fired from her job.
Girls can even sexualize a dead man, but that's fine?
Why is our society so biased? pic.twitter.com/p6IefgPKFK
केईएम हॉस्पिटल ॲक्शन मोडमध्ये
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर केईएम हॉस्पिटल प्रशासनाने याची अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. वैद्यकीय अभ्यासासाठी दान करण्यात येणाऱ्या मृतदेहांचा हा थेट अपमान मानला जात आहे. त्यामुळे केईएम हॉस्पिटलने डॉ. सेजल पवार हिच्या या वक्तव्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने चौकशी समितीला तात्काळ कामाला लावले असून उद्यापर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या अहवालानंतर सेजलवर कॉलेज प्रशासनाकडून निलंबनाची किंवा इतर मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
( नक्की वाचा : JPMorgan :'माझ्यासोबत झोपला नाहीस तर संपवून टाकेन'; बड्या कंपनीच्या महिला बॉसच्या धमकीने भारतीय तरुण उद्ध्वस्त )
सेजल पवारची जाहीर माफी
चौफेर टीका आणि हॉस्पिटलकडून चौकशी सुरू झाल्यानंतर डॉ. सेजल पवार हिने इन्स्टाग्रामवर एक मोठी पोस्ट शेअर करत जाहीर माफी मागितली आहे. तिने लिहिले की, नुकतीच माझी एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ पुन्हा पाहिल्यानंतर मला जाणीव झाली आहे की माझ्या बोलण्यामुळे लोकांच्या भावना का दुखावल्या गेल्या. मी ज्या विषयावर बोलले तो अत्यंत संवेदनशील होता.
कोणाचाही अनादर करण्याचा माझा हेतू नव्हता, पण माझ्या शब्दांचा काय परिणाम झाला हे मी समजू शकते. मी माझ्या चुकीची पूर्ण जबाबदारी घेते. एक विद्यार्थिनी म्हणून हा माझ्यासाठी मोठा धडा आहे आणि भविष्यात अशी चूक माझ्याकडून कधीही होणार नाही, असे सांगत तिने हात जोडले आहेत. मात्र, माफी मागितली असली तरी हॉस्पिटलच्या कारवाईची तलवार आता तिच्यावर टांगलेली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world