जाहिरात

Mumbai News : सेजल पवारला दणका, 5 सदस्यीय समितीची स्थापना; KEM रुग्णालयाकडून कडक कारवाईचे आदेश

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे वादात सापडलेली केईएम रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी सेजल पवार हिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

Mumbai News : सेजल पवारला दणका, 5 सदस्यीय समितीची स्थापना; KEM रुग्णालयाकडून कडक कारवाईचे आदेश

Mumbai News : स्टँडअप कॉमेडियन प्रणीत मोरे याच्या शोमध्ये मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणारी सेजल पवार जबर धक्का बसला आहे. सेजल ही मुंबईतील प्रसिद्ध केईएम मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी आहे. प्रणीत मोरेच्या शोनंतर तिचा केईएम कॉलेजला 'चिंधी' म्हणाल्याचा व्हिडिओही समोर आला आहे. सेजल पवार हिला केईएम मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापनाकडून १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. या कालावधीत तिला रुग्णालय, कॉलेज परिसर किंवा वसतिगृहात प्रवेश दिला जाणार नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून ती सात दिवसांच्या आत आपला अहवाल सादर करेल.

सेजल पवार सक्तीच्या रजेवर

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे वादात सापडलेली केईएम रुग्णालय आणि मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी सेजल पवार हिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान, व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती ही सेजल पवारच असल्याचे निष्पन्न झाले. व्हिडिओमधील वक्तव्ये संस्थेच्या मते प्रथमदर्शनी अनुचित आणि अस्वीकार्य होती. प्राथमिक निष्कर्षांनंतर, प्रशासनाने तिला १५ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला.

नक्की वाचा - Ratnagiri News : अवघ्या काही दिवसांची प्रतीक्षा, पावसाळ्यानंतर मुंबई-गोवा महामार्ग होणार सुसाट; काय आहे कारण?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत सेजलला केईएम रुग्णालय परिसर, मेडिकल कॉलेज किंवा वसतिगृहाच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच तिला कोणत्याही शैक्षणिक किंवा अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही. दरम्यान पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली असून, ती पुढील सात दिवसांत आपला अहवाल सादर करेल अशी अपेक्षा आहे. समितीच्या निष्कर्षांनुसार पुढील कारवाई काय करायची याबाबत ठरवलं जाईल.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com