Ketan Agarwal Murder: 'सियाला कधी पाहिलंच नाही! माझा मुलगा तर दुकानात...' आरोपी चेतनच्या वडिलांचा मोठा दावा!

Pune Ketan Agarwal Murder: या प्रकरणातील आरोपी चेतन चौधरीच्या वडिलांनी मुलाची बाजू घेत मोठा दावा केला आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
Pune Ketan Agarwal Murder: आरोपी चेतनच्या वडिलांनी या विषयावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे:

Pune Ketan Agarwal Murder: पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सातत्याने नवे अपडेट समोर येत आहेत.  लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलून केतन अग्रवालची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात केतनची होणारी बायको सिया गोयल तसंच सियाचा प्रियकर चेतन चौधरीला अटक करण्यात आली आहे. चेतनच्या वडिलांनी या प्रकरणात त्यांच्या मुलाची  मुलाची बाजू घेत मोठा दावा केला आहे. चेतनला या प्रकरणात जबरदस्तीने सहआरोपी बनवून खोट्या केसमध्ये अडकवले जात असल्याचे त्याच्या वडिलांनी म्हटले आहे.

22 वर्षांच्या चेतन चौधरीचे वडील बाबूलाल यांनी असा दावा केला आहे की, मुख्य आरोपी सिया गोयल स्वतःला वाचवण्यासाठी त्यांच्या मुलाला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत आहे. या हायप्रोफाइल हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Advertisement

सियाला कधी पाहिलेच नाही

किराणा दुकानाचे मालक असलेल्या बाबूलाल चौधरी यांनी सांगितले की, त्यांनी त्या मुलीला म्हणजेच सियाला यापूर्वी कधीही पाहिले नव्हते आणि त्यांना तिच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. पोलीस ठाण्यात गेल्यावरच त्यांना पहिल्यांदा तिचे नाव सिया असल्याचे समजले. जेव्हा त्यांची चेतनशी भेट झाली, तेव्हा चेतनने पोलिसांना सांगितले की, घटनेच्या वेळी तो सिया आणि केतन यांच्यापासून खूप दूर उभा होता. 

चेतन त्या दिवशी लोहगड किल्ल्यावर काय करत होता आणि तो तिथे का गेला होता, याबद्दल त्याने घरात काहीही सांगितले नव्हते, असेही त्याच्या वडिलांनी स्पष्ट केले.

आपला मुलगा पूर्णपणे निर्दोष असल्याचे सांगताना बाबूलाल म्हणाले की, चेतन तसा मुलगा नाही आणि त्याचा या गुन्ह्यात कोणताही सहभाग नाही. तसेच चेतन आणि सिया गोयल यांच्यात काही अफेअर सुरू होते का, याबद्दलही आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. चेतन नेहमी किराणा दुकानात कामाला येत असे, त्यामुळे तो यात सामील असूच शकत नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

( नक्की वाचा : Pune News: केतन अग्रवाल हत्याकांडावर आरोपी चेतन चौधरीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया; प्रकरणाला वेगळंच वळण )

चेतन रडला आणि म्हणाला....

चेतनचे काका उदयराम चौधरी यांनीभी चेतनच्या चांगल्या स्वभावाचा दाखला दिला. चेतन हा एक खेळाडू असून अत्यंत साधा माणूस आहे, त्याच्याविरुद्ध आजपर्यंत कधीही कोणतीही तक्रार आलेली नाही, असे ते म्हणाले. कुटुंबाला चेतन आणि त्या मुलीच्या संबंधांबद्दल कोणतीही माहिती नव्हती. पोलीस ठाण्यात जेव्हा चेतनची 1 मिनिटासाठी भेट झाली, तेव्हा तो रडू लागला आणि मला या प्रकरणात खोटे फसवले जात आहे, असे त्याने सांगितल्याचे काका म्हणाले.

Advertisement

चेतनचे वकील राम शाहणे यांनीही कोर्टात हीच बाजू मांडली आहे. एफआयआरमध्ये देखील चेतनच्या भूमिकेबद्दल स्पष्ट वर्णन नाही. केवळ तो मुख्य आरोपी का प्रियकर आहे, याच एका संशयावरून त्याला या प्रकरणात अडकवण्यात आले आहे, असा युक्तिवाद वकिलांनी पहिल्या सुनावणीदरम्यान केला.

( नक्की वाचा : Pune News: सियानं पळून जाऊन लग्न का केलं नाही? एका भीतीने 20 वर्षांची मुलगी बनली क्रूर खुनी )
 

लोहगड किल्ल्यावर काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 वर्षांची सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांनी मिळून 18 जून रोजी पुणे जवळील लोहगड किल्ल्यावरून 26 वर्षांचा मंगेतर केतन अग्रवाल याला खोल दरीत ढकलून दिले होते. सिया आणि केतनचा साखरपुडा फेब्रुवारीमध्ये झालाध होता आणि नोव्हेंबरमध्ये जयपूरमध्ये एका भव्य समारंभात त्यांचे लग्न होणार होते. केतन हा त्यांच्या कौटुंबिक रिअल इस्टेट व्यवसायात संचालक होता.

Advertisement

घटनेनंतर सियाने केतनच्या कुटुंबाला सांगितले होते की, ट्रेकिंग दरम्यान केतनचा पाय घसरला. मात्र, पोलिसांच्या तपासात हत्येचा हा कट उघडकीस आला आणि 23 जून रोजी त्या दोघांना अटक करण्यात आली. सिया आणि चेतन गेल्या वर्षी दिवाळीत एका पार्टीत भेटले होते आणि सुमारे 6 महिने संपर्कात होते. या काळात त्यांनी एकमेकांना 2000 पेक्षा जास्त कॉल केले होते आणि सुमारे 238 तास फोनवर संभाषण केले होते.

तपासात असे समोर आले आहे की, सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर जाण्यासाठी अनेकदा तयार केले होते. ते 31 मई रोजीही लोहगडला गेले होते. त्यानंतर सियाने अवघ्या चार दिवसांत पुन्हा तिथे जाण्याचा हट्ट केला, पण केतनच्या आईने नकार दिला. अखेर 14 जून रोजी पुन्हा प्लॅन झाला. 

त्या दिवशीही सियाने केतनला कड्यावरून ढकलण्याचा प्रयत्न केला होता, पण केतनने एका झाडाला पकडल्यामुळे तो वाचला. तेव्हा सियाने तिथे साप दिसल्याचे सांगून आपण केतनचा जीव वाचवल्याचे नाटक केले होते. अखेर 18 जूनच्या सकाळी सिया आणि चेतन पुण्यातील एका कॅफेमध्ये भेटले आणि त्यांनी केतनच्या हत्येचा अंतिम कट रचून योग्य जागा निश्चित केली.

ती हुडी पडली महाग

या संपूर्ण कटाचा पर्दाफाश करण्यात सीसीटीव्ही फुटेज आणि हवामानाचा अंदाज अत्यंत महत्त्वाचा ठरला. सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांना दिसले की, चेतन हुडी घालून केतन आणि सियाचा पाठलाग करत होता. तो हाताने इशारे करून सियाशी बोलत होता. एकदा सियाने मागे वळून पाहताच तो खाली बसला.

पोलिसांनी 18 जून रोजीच्या त्या वेळेचे हवामान तपासले असता तिथे 33 डिग्री सेल्सिअस तापमान होते. भर उन्हाळ्यात आणि एवढ्या उष्णतेमध्ये कोणी हुडी का घालेल? या एका शंकेमुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर चौकशीदरम्यान सर्व दुवे जोडले गेले आणि पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पीटीआईला दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतनचा हा पूर्वनियोजित कट उघडकीस आला.