Konkan Railway : कोकण रेल्वेची तिकिटे दोन मिनिटात हाऊसफुल, चाकरमान्यांची निराशा

वेटिंग तिकिटांचा कोटा वाढवून सुद्धा कोणालाही वेटिंग तिकीट मिळाले नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.  चार दिवस रांगेत उभे राहून देखील तिकीट मिळत नसेल तर नेमकं तिकीट बुक कोण करतंय असा संतप्त सवाल प्रवाशांनी विचारला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Konkan Railway : कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. मात्र गणेशोत्सवात कोकणात जाणे हे मोठं आव्हान असतं. कारण रस्ते आणि रेल्वे दोन्ही मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. रेल्वेचे तिकीट मिळवण्यासाठी नागरिकांची आधीपासूनच धडपड सुरु होते. रेल्वेकडून आता तिकीट विक्री सुरू झाली आहे. मात्र कोकण रेल्वेची तिकिटे दोन मिनिटात हाऊसफुल झाल्याने भक्तांची निराशा झाली आहे.  

कोकण रेल्वेचं तिकीट मिळवण्यासाठी चार दिवस रांगेत उभे राहूनही तिकीट न मिळाल्याने प्रवासी नाराज झाले आहेत. दिव्याहून रेल्वे सोडण्याची मागणी आता नागरिक करत आहेत. मात्र पावसाळ्यात सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वेने गाड्यांची संख्या मर्यादित केली आहे.  

(नक्की वाचा-  Toll Comparison: रस्तेप्रवास होईल स्वस्त! कमी टोल लागले असा रस्ता दाखवेल हे अ‍ॅप)

वेटिंग तिकिटांचा कोटा वाढवून सुद्धा कोणालाही वेटिंग तिकीट मिळाले नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.  चार दिवस रांगेत उभे राहून देखील तिकीट मिळत नसेल तर नेमकं तिकीट बुक कोण करतंय असा संतप्त सवाल प्रवाशांनी विचारला आहे. मध्य रेल्वेच्या 126 तिकीट खिडक्या तरीही सगळ्या खिडकींवर हाच प्रकार निदर्शनास आला आहे. 

कोणत्या दिवशी कोणते बुकिंग? 

22 ऑगस्ट रोजी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी तिकिटांचे बुकिंग 23 जून (सोमवार) रोजी होते. 23 ऑगस्टचे तिकीट 24 जूनला (मंगळवार), 24 ऑगस्टचे तिकीट 25 जूनला (बुधवार), 25 ऑगस्टचे तिकीट 26 जूनला (गुरुवार), 26 ऑगस्टचे तिकीट 27 जूनला (शुक्रवार) होते. तर 27 ऑगस्टचे तिकीट 28 जूनला (शनिवार), 28 ऑगस्टचे तिकीट रविवारी 29 जूनला  बुक करता येईल.

Advertisement

(नक्की वाचा-  FASTag Annual Pass: फास्ट- टॅग वार्षिक पास नेमका काय? सामान्यांना कसा फायदा होणार? वाचा A टू Z माहिती)

तिकीट बुकिंग करताना हे लक्षात ठेवा

तिकीट बुक करताना मूळ स्थानकावरून ट्रेन सुटण्याच्या दिवसाचा विचार करावा. महाराष्ट्रातील स्थानकांवरून उत्तर आणि दक्षिण भारतातून सुटणाऱ्या गाड्यांसाठी एक दिवस अगोदर आरक्षण करावे लागेल.  जर तुम्हाला 26 ऑगस्ट 2025 रोजी कल्याण ते खेड/चिपळूण/कणकवली असा प्रवास करायचा असेल तर आरक्षण 26 जून 2025 रोजी सुरू होईल. त्याचप्रमाणे जर तुम्हाला 3 सप्टेंबर 2025 रोजी कुडाळ/रत्नागिरी/संगमेश्वर/चिपळूण/खेड ते पनवेल/कल्याण/मुंबई असा प्रवास करायचा असेल तर आरक्षण 4 जुलै 2025 रोजी सुरू होईल.