
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) लवकरच त्यांच्या 'राजमार्ग यात्रा अॅप' (Rajmarg Yatra App) या मोबाईल अॅपमध्ये एक नवीन फीचर जोडणार आहे. या फीचरच्या मदतीने, तुम्हाला कळेल की दोन शहरांमधील कोणत्या मार्गावर सर्वात कमी टोल टॅक्स असेल. राजमार्ग यात्रा अॅप 2023 मध्ये लाँच करण्यात आले होते, जे हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्त्यांची स्थिती, सुविधा आणि आपत्कालीन सेवांशी संबंधित माहिती देते.
आता त्यात जोडल्या जाणाऱ्या नवीन फीचरमुळे टोलची तुलना करणे आणखी सोपे होईल. अँड्रॉइड फोन युजर्स हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. तर आयफोन युजर अॅपल स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात.
(नक्की वाचा- FASTag Annual Pass: फास्ट- टॅग वार्षिक पास नेमका काय? सामान्यांना कसा फायदा होणार? वाचा A टू Z माहिती)
नवीन फीजर कसं काम करेल?
NHAI च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आता जेव्हा एखादा प्रवासी अॅपवर त्याच्या गंतव्यस्थानापर्यंतचा प्रवास शोधेल, तेव्हा अॅप विविध मार्गांचे टोल शुल्क दाखवेल. यामुळे प्रवाशांना त्यांच्या बजेटमध्ये कोणता मार्ग चांगला असेल हे ठरवण्यास मदत होईल.
उदाहरणार्थ, जर एखाद्याला दिल्लीहून लखनऊ प्रवास करायचा असेल तर त्याच्याकडे यमुना एक्सप्रेसवे, गाझियाबाद-अलिगढ-कानपूर महामार्ग, मुरादाबाद-बरेली-सीतापूर कॉरिडॉर असे अनेक पर्याय आहेत. हे अॅप या सर्व मार्गांचे टोल शुल्क दाखवेल आणि सर्वात स्वस्त मार्ग हायलाइट करेल. यामुळे ज्या मार्गावर तुम्हाला सर्वात कमी टोल भरावा लागेल त्या मार्गावर तुम्ही प्रवास कराल आणि तुमचे पैसे वाचतील.
(नक्की वाचा- Fact Check: दुचाकी वाहनांना टोल भरावा लागणार? काय आहे सत्य, NDTV मराठीची Exclusive बातमी)
15 ऑगस्टपासून फास्टॅगचा वार्षिक पास
एनएचएआयने अलीकडेच 3 हजार रुपयांचा वार्षिक फास्टॅग पास सुरू करण्याबद्दल सांगितले आहे. ज्यामुळे तुम्ही कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाच्या टोल प्लाझावर कोणतेही शुल्क न भरता 200 वेळा प्रवास करू शकता. ही सुविधा 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र हा पास फक्त NHAI टोल प्लाझावरच वैध असेल. राज्य सरकारच्या टोल प्लाझावर तो लागू होणार नाही. हा पास एक वर्षासाठी वैध असेल. 200 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा रिचार्ज करावा लागेल. यासाठी NHAI च्या वेबसाइट (https://nhai.gov.in) किंवा राजमार्ग यात्रा अॅपद्वारे अर्ज करता येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world