Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला आणखी एक चाळणी; 'या' महिलांना मिळणार नाही लाभ

आता लाडकी बहीण योजनेला आणखी एक छाननी लागणार असल्याची माहिती आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

महायुती सरकारसाठी महत्त्वपूर्ण ठरलेल्या लाडकी बहीण योजनेला आणखी एक चाळणी बसणार असल्याची माहिती आहे. अपात्र महिलांकडूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर गेल्या सहा महिन्यात लाडकी बहीण योजनेची विविध पातळीवर छाननी केली जात आहे. आता लाडकी बहीण योजनेला आणखी एक छाननी लागणार असल्याची माहिती आहे. 

प्राप्तिकर विभागाच्या अखत्यारित असलेल्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून लाभार्थी महिलांसंबंधित माहिती उपलब्ध करू देण्यास मान्यता दिली आहे. त्यामध्ये महिलांच्या इन्कम टॅक्स रिटर्न डेटाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिलांची यादी तयार करून त्यांना मिळणारा लाभ बंद करण्यात येणार आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Modi Government : मोदी सरकारला 11 वर्षे पूर्ण, भाजप मंत्र्यांकडे मोठी जबाबदारी; मुख्यमंत्रीही घेणार पत्रकार परिषद

ही योजना सुरू केली तेव्हा राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी काही पात्रता दिली होती. त्यामध्ये प्रामुख्याने अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे अशी अट घातली होती. मात्र प्रत्यक्षात 2.5 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांनीही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केल्याचं समोर आलं आहे.