Ladki Bahin Yojana e-KYC Updates: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी माहिती समोर आलीय. ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रक्रिया चुकली असेल त्यांच्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी (6 फेब्रुवारी) ही घोषणा केलीय. यामुळे राज्यातील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळालाय. लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया करताना काही चुकीचे पर्याय निवडले गेल्यानं काही महिलांना योजनेचा लाभ मिळणं बंद झालं होतं. पण आता अर्जामध्ये सुधारण्यास करण्यासाठी पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात आलीय.
आदिती तटकरे यांची घोषणा, पाहा पोस्ट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी!
आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की, "e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा सर्व बहिणींना आपली e-KYC माहिती दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका आहे. म्हणूनच, ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत काही चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती."
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: ३१ मार्च पर्यंत e-KYC दुरुस्तीची संधी!
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) February 6, 2026
e-KYC प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी e-KYC करूनही त्यांना अद्याप… pic.twitter.com/tggmXwgtOa
(नक्की वाचा: Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा)
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना e-KYC प्रक्रियेत नेमकी चूक काय झाली ? | Ladki Bahin Yojana e-KYC Updates
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील खऱ्या लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी e-KYC प्रक्रिया राबवण्यात आली, ज्यामध्ये काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये एक प्रश्न असा होता: "तुमच्या घरातले कोणी सरकारी नोकरीत नाही ना?" या प्रश्नाचे उत्तर देताना असंख्य महिलांनी चूक केलीय. प्रश्न न समजल्याने काही महिलांने या प्रश्नाचे उत्तर 'नाही' ऐवजी 'हो' दिले होते. याचा अर्थ असा झाला की संबंधित महिलेनं मान्य केले की त्यांच्या घरातील एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे. नियमानुसार घरातील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी असेल तर संबंधित महिलेला योजनेचा लाभ मिळत नाहीत, त्यामुळे संगणकीय प्रणालीनुसार लाखो महिलांच्या खात्यात योजनेचा हप्त येणे आपोआप बंद झाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world