जाहिरात

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसंदर्भात एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
"Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा"
DCM Eknath Shinde X

- राकेश गुडेकर, प्रतिनिधी

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा लाडक्या बहि‍णींना मोठं आश्वासन दिलंय. चिपळूणमध्ये जाहीर सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, माझी सर्वात आवडती आणि महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेवर सुरुवातीला अनेकांनी टीका केली, पण ही योजना सुरू करणं हे धाडसाचं पाऊल होतं. दरवर्षी सुमारे 45 हजार कोटी रुपये खर्च येत असतानाही, ही योजना राबवण्यात आली. या योजनेमुळे भविष्यात अनेक गंभीर आणि सकारात्मक सक्सेस स्टोरी समोर येतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

(नक्की वाचा: Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण'बाबत महत्त्वाची अपडेट! अदिती तटकरेंनी केली मोठी घोषणा; EKYCची कोणतीही अडचण...)

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचे विधान

महत्त्वाचं विधान करताना CM एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं की,"ही योजना कधीही बंद होणार नाही. तसेच योग्य वेळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्यात येतील, ही बाब नाकारत नाहीय(Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana)."

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी (3 फेब्रुवारी 2026) रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात ही सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

(नक्की वाचा : Ladki Bahin e-KYC error: लाडकी बहीण योजनेचा हफ्ता का मिळाला नाही? उघडकीस आली मोठी चूक; जबाबदार कोण?)

शेतकऱ्यांनाही योग्य ती मदत केली जातेय : एकनाथ शिंदे

याच सभेमध्ये आपल्या कार्यकाळातील कामांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले की,"मला कोणावर टीका टिपण्णी करायची नाही. विकासाला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि विकास हाच अजेंडा पुढे घेऊन जात आहोत". यासोबतच शेतकऱ्यांनाही योग्य ती मदत केली जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून सर्व घटकांचा विचार त्यामध्ये करण्यात आल्याचं मत त्यांनी मांडलं. "आम्ही राबवलेल्या योजनांमध्ये 80 टक्के समाजकारण आणि फक्त 20 टक्के राजकारण आहे", असेही ते म्हणाले. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com