मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दिवाळीच हाफ्ता कधी जमा होणार आहे याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. शिवाय सर्व पात्र लाडक्या बहीणींनी E-KYC करणे बंधनकारक आहे. पुढील दोन महिन्यात ही E-KYC करणे बंधनकारक आहे. E-KYC साठी सुरूवात झाल्यानंतर ओटीपीची अडचण निर्माण झाली होती. पण ती तांत्रिक अडचण दूर करण्यात आली आहे. त्यामुळे आता E-KYC कुठे कराल याची लिंकही तटकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती असं ट्वीटमध्ये आदित तटकरे यांनी म्हटलं आहे. त्या आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस सुरूवात झाली आहे. पुढील दोन तीन दिवसात म्हणजे 13 ऑक्टोबरपर्यंत सर्व पात्र लाडक्या बहीणींच्या खात्यात हे पैसे जमा होतील असं त्यांनी सांगितले आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे असं त्यांनी सांगितलं.
नक्की वाचा - Viral video: ही अमेरिकन महिला म्हणते भारतात अजिबात जाऊ नका, कारण ऐकून धक्का बसेल
त्या पुढे लिहीतात महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील 2 महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती असं आदित तटकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये सांगितले आहे. त्यामुळे ज्यांनी E-KYC प्रक्रीया पूर्ण केलेली नाही त्यांनी पुढील दोन महिन्यात पूर्ण करायची आहे.
https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC करता येणार आहे. सुरूवातीच्या काळात यावरून E-KYC करताना अडचणी येत होत्या. ओटीपी मिळत नव्हता. त्यामुळे E-KYC प्रक्रीया पूर्ण होत नव्हती. त्यामुळे अनेक महिलांची ही प्रक्रीया अपूर्ण राहीली आहे. याबाबतची तक्रार महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्यापर्यंत गेली होती. त्यानंतर त्यात काही तांत्रिक अडचणी असल्याचं समोर आले होते. त्यातील तांत्रिक अडचणी आता दुर झाल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर आदिती यांनी ट्वीट करत पुढील दोन महिन्यात ईकेवायसी करण्याचे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्या पासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित… pic.twitter.com/6e3CgboGVL
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) October 9, 2025