अमजद खान
डोंबिवली-दावडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे जागा आहे. या जागेवर भूमाफियांनी आठ मजली बेकायदा इमारत उभारली होती. याबाबत केडीएमसीकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आज सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी ही बेकायदा इमारत पाडण्याची कारवाई सुरु केली आहे. मात्र इतकी मोठी इमारत उभी राही पर्यंत केडीएमसी काय करत होती हा प्रश्न मात्र नेहमी प्रमाणे अनुत्तरीत राहात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
27 गावातील दावडी परिसरात कल्याण शीळ रस्त्यालगत दावडी गाव आहे. याठिकाणी असलेल्या व्यंकटेश पेट्रोप पंपाच्या मागच्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चिरंजीव यशंवत आंबेडकर यांच्या नावे जागा आहे. या जागेच्या महसूली कागदपत्रांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर, रमाई तेलतुंबडे यांची नावे आहेत.
ट्रेंडिंग बातमी - पाकिस्तानच्या गुप्तहेरांचे धक्कादायक जबाब, 'असे' अडकले दानिशच्या जाळ्यात
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे असलेल्या या जागेवर भूमाफियांनी सात मजली इमारत उभी केली होती. या बेकायदा बांधकाम प्रकरणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे यांनी महापालिका आयुक्त, तहसीदार, पोलिस आयुक्त यांच्यासह सहाय्यक आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. ही बेकायदा इमारत पाडण्यात यावी. बेकायदा इमारत उभारणाऱ्यां विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणी ललित महाजन याला महापालिकेने नोटिस बजावली होती. त्यांनी त्यांच्या बांधकामाची कागदपत्रे सादर करा असे सांगितले होते. त्यांनी कादगपत्रे सादर केली नाही. त्यामुळे महापालिकेने ही सात मजली इमारत बेकायदा ठरविली आहे. ही इमारत बेकायदा ठरविल्यावर संबंधितांनी ती स्वत: पाडून टाकावी अशी नोटिस महापालिकेने बजावली. त्याला महाजन यांचा काही एक प्रतिसाद आला नाही. शेवटी सात मजली बेकायदा इमारत पाडण्याकरीता कारवाई पोलिस बंदोबस्तात आजपासून सुरु केली आहे.