
भारतीय यूट्यूबर ज्योती मल्होत्रा पाकिस्तान उच्चायुक्तालयात बसलेल्या दानिशच्या संपर्कात होती. त्याबद्दल आणखी बरीच माहिती समोर आली आहे. दानिश हा पाकिस्तान उच्चायुक्तालयात व्हिसा डेस्कवर अधिकारी होता. तो केवळ भारतीयांना पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्यास प्रवृत्त करत नव्हता, तर उच्चायुक्तालयात बसून लाचखोरीही करत होता. चौकशीत ही बाब आता समोर आली आहे. शिवाय अनेक अशा धक्कादायक गोष्टीही या प्रकरणात उजेडात आल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
व्हिसासाठी 5 हजार रुपये लाच घेत असे
दानिश एका व्हिसाची फाइल क्लियर करण्यासाठी 5 हजार रुपये लाच घेत असे. लाचेची ही रक्कम अटक केलेल्या यामीन मोहम्मदकडे जमा केली जात असे. दानिश आणि यामीनचा संबंधही त्यामुळे उघड झाला आहे. यामीन मोहम्मद हा पाकिस्तान उच्चायुक्तालयात व्हिसासाठी येणाऱ्या लोकांना फसवून दानिशशी भेट घालून देत असेल. त्यानंतर दानिशच्या सांगण्यावरूनच यामीन क्लायंटकडून लाचेची रक्कम घेत असेय. दानिशचा मोबाइल नंबर ***8939 पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या नावाने नोंदणीकृत असल्याचं ही आता समोर आलं आहे.
दानिशच्या संपर्कात यामीन कसा आला?
दानिश हा त्याच्या नंबरवरून ज्योती, गजाला आणि यामीनशी व्हॉट्सॲप, स्नॅपचॅटवर व्हॉइस कॉलद्वारे बोलत असे. गजाला आणि तारिक जावेद यांच्याकडे ही ही पाकिस्तानी व्हिसा असल्याचे समोर आले आहे. त्यावर पाकिस्तान उच्चायुक्तालय, नवी दिल्ली असे लिहिलेले आहे. त्यावर शिक्काही दिसत आहे. गजाला, यामीन आणि देवेंद्र सिंग ढिल्लो यांच्याशी झालेल्या केंद्रीय एजन्सींच्या चौकशीचा अहवालही समोर आला आहे.
गजालाने चौकशीत काय सांगितले?
मी गजाला, माझ्या पतीचे कोविडमध्ये निधन झाले होते. मी पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होते. दुसऱ्यांदा मार्चमध्ये पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेले होते. पहिल्यांदा जेव्हा मी पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेले, तेव्हा मला तिथे व्हिसा डेस्कवर दानिश नावाचे पाकिस्तानी अधिकारी भेटले. त्यांनी माझ्याबद्दल सर्व माहिती विचारली. मला त्यांचा मोबाइल नंबर दिला. मी कागदपत्रे पूर्ण करून तिथून निघाले. माझा नंबरही दानिश नावाच्या पाकिस्तानी अधिकाऱ्याकडे होता. त्यानंतर त्यांनी मला फोन केला. त्यांनी सांगितले की, काही व्हिसाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता आहे. तुम्हाला पुन्हा एकदा पाकिस्तान उच्चायुक्तालयात यावे लागेल. यानंतर मी पुन्हा पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेले. त्याच वेळी आमची खूप चर्चा झाली. त्यानंतर दानिश आणि आम्ही दोघे सतत बोलू लागलो. दानिशने मला सांगितले की त्याचे लग्न झाले आहे. त्याची पत्नीही त्याच्यासोबत राहते, पण त्याला माझ्याशी लग्न करायचे होते. तो आपल्या पत्नीलाही याबद्दल सांगणार होता. माझी आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्याने मला पैसे देण्याचं ही सांगितलं. त्यासाठी त्याने मला यूपीआयद्वारे सुमारे 20,000 रुपये पाठवले. हे पैसे यामीनद्वारे माझ्यापर्यंत पोहोचले. दानिश जेव्हा दिल्लीत इंडिया गेट किंवा इतर अनेक ठिकाणी फिरायला जात असे, काही छोटी-मोठी खरेदी किंवा खाणेपिणे करत असे, तेव्हा तो मला त्या दुकानाचा क्यूआर कोड पाठवत असे आणि म्हणत असे की यावर पैसे पाठवून द्या. त्याच 20,000 मधून तो मलाही खर्च करायला सांगत असे. मी त्याच्यानुसार ते सर्व करत होते. त्याने मला विचारलेही की पंजाबमध्ये सैन्याशी संबंधित काही माहिती तुमच्याकडे आहे का? असल्यास मला द्या किंवा मिळवा. माझे पाकिस्तानच्या लाहोरमध्ये काही नातेवाईक राहतात. त्यांनी मला सांगितले की तुम्ही इथे या, इथे कपड्यांचा व्यवसाय करू, तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारेल, त्यामुळे मला पाकिस्तानला जायचे होते.असं तिने चौकशीत सांगितलं.
यामीनने चौकशीत काय सांगितले?
यामीनने सांगितले की, मी दोनदा पाकिस्तानला जाऊन आलो आहे. दानिशला खूप चांगले ओळखत होतो. जेव्हा मी आपला व्हिसा घेण्यासाठी पाकिस्तान उच्चायुक्तालयात पोहोचलो, तेव्हा माझी दानिशशी भेट झाली. त्यानंतर आम्ही खूप बोललो. दानिशने मला सांगितले की, पाकिस्तान उच्चायुक्तालयात व्हिसा मिळवण्यासाठी जे लोक येतात, त्यांच्या संपर्कात राहा. मी त्यांचा व्हिसा लवकर देण्यासाठी पूर्ण मदत करीन. त्या बदल्यात तुम्ही त्यांच्याकडून कमिशन मागा. पैसे आपल्याजवळ ठेवा. या बदल्यात मी तुमच्या ओळखीच्या लोकांचा व्हिसा लवकर लावून देईन. हे कमिशनचे पैसे माझे असतील. त्यानंतर मी दानिश सांगत होता त्या नुसार काम करू लागलो. मी दानिशकडे लोकांना व्हिसासाठी पाठवू लागलो. प्रत्येक अर्जासाठी 5,000 रुपये घेत असे. मी 4 अर्ज लावले, ज्यात 20,000 मिळाले. जे मी दानिशच्या सांगण्यावरून गजालाच्या यूपीआयमध्ये ट्रान्सफर केले होते. मी माझ्या नातेवाईकाला भेटायला गुजरांवाला इथं दोनदा गेलो होतो. असं त्याने ही कबूल केलं.
देवेंद्र सिंग ढिल्लोने चौकशीत काय सांगितले?
मी 3000 लोकांच्या जथ्थ्यासह करतारपूर कॉरिडॉरला गेलो होतो. ज्यात 125 लोक हरियाणामधील होते. वाघा बॉर्डरला पोहोचल्यावर आम्हाला एक स्कॉट (सैनिक) भेटला. तेव्हा माझी विक्की नावाच्या पाकिस्तानी नागरिकाशी भेट झाली. मला माहित नव्हते की हा पाकिस्तान आयएसआयसाठी काम करतो. विक्कीने मला खूप मदत केली. मला खूप फिरवले, मग पूजा तिथे केली. मग आम्ही लाहोरला पोहोचलो, तिथे विक्कीने माझी अर्शलान नावाच्या एका व्यक्तीशी भेट घडवली. आम्ही त्याला एका हॉटेलमध्ये भेटायला गेलो. जिथे विक्कीच्या मित्र अर्शलानची एक मैत्रिण उपस्थित होती. माझी तिथे तिच्याशी बातचीत झाली. आम्ही दोघांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले. आम्ही एकत्र शॉपिंग करायलाही गेलो. त्या मुलीची इंस्टाग्राम आयडीही माझ्याकडे होती. जेव्हा मी भारतात परत आलो, तेव्हा तिने मला ब्लॉक केले. विक्कीने मला एका गरिबाची मदत होईल असे सांगून एका भारतीय फोन नंबरवर, ज्यात क्यूआर कोड चालू होता, त्यात 1500 रुपये टाकायला सांगितले. मी त्या क्यूआर नंबरवर पैसे टाकले. मी विक्कीशी स्वतःहूनही संपर्क साधला होता. करतारपूरमध्ये आपल्या ओळखीच्या लोकांच्या दर्शनाचती व्यवस्था करण्याची विनंती केली होती. विक्कीने मला एक दिवस सांगितले की, तू मला एक भारतीय सिम उपलब्ध करून दे. सुरक्षा एजन्सी आता हे शोधत आहेत की, तो भारतीय नंबर कोणाचा होता. तो नंबर विक्की नावाच्या पाकिस्तान आयएसआयच्या हँडलरपर्यंत कसा पोहोचला, याचीही चौकशी केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world