Railway News : मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम; 200 हून अधिक कर्मचारी युद्धपातळीवर कार्यरत

लोणावळा–कर्जत घाट विभागातील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिनदरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

Lonavala News : लोणावळा–कर्जत घाट विभागातील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिनदरम्यान झालेल्या भूस्खलनामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हा प्रकार घडला. 6 जुलै रोजी अवघ्या चार तासांत 140 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. याआधी 5 जुलै रोजी 327 मिमी आणि 4 जुलै रोजी 162 मिमी पाऊस झाला होता.

रेल्वे सेवांवरील परिणाम...

- एकूण 26 गाड्या रद्द
- 47 गाड्यांचे मार्ग बदलले
- 19 गाड्या अंशतः गंतव्यापर्यंतच धावणार
- 15 गाड्या अंशतः प्रारंभ करण्यात आल्या
- 3 गाड्या पुनर्नियोजित 
- 5 गाड्या पुनर्नियोजित करून मार्गही बदलण्यात आला

मुंबई–पुणे मार्गावरील डेक्कन क्वीन, डेक्कन एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, सिंहगड एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस यांसह अनेक महत्त्वाच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या कल्याण–इगतपुरी–मनमाड–दौंड किंवा सुरत–जळगाव–मनमाड–दौंड या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

Advertisement

नक्की वाचा - Mahabaleshwar Closed :सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांवर बंदी; सह्याद्री पर्वतरागांवर पावसाचा हाय अलर्ट! 

घाट विभागात सुरू असलेल्या पुनर्बांधणी आणि ट्रॅक सुरक्षिततेच्या कामासाठी 200 कर्मचारी तैनात करण्यात आले असून, आणखी 200 अतिरिक्त कर्मचारी घटनास्थळी पाठवण्याची तयारी सुरू आहे.