12 hours ago

लोकसभेनंतर राज्यसभेत 12 तासांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेनंतर गुरुवारी रात्री उशिरा वक्फ दुरुस्ती विधेयकही मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 128 तर विरोधात 95 मते पडली. याआधी बुधवारी लोकसभेत 12 तासांच्या चर्चेनंतर हे विधेयक मंजूर झाले. 

आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवले जाईल. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल. लोकसभेत 288 खासदारांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने मतदान केले. तर 232 खासदारांनी विरोधात मतदान केले. 

Apr 04, 2025 23:25 (IST)

IPL 2025 , MI vs LSG : थरारक लढतीत हार्दिकचे प्रयत्न अपुरे, मुंबई इंडियन्सचा पराभव

आयपीएल 2025 मधील मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (Mumbai Indians vs Lucknow Super Giants) हा सामना चांगलाच रंगतदार झाला. यजमान लखनौनं पहिल्यांदा बॅटिंग करत 204 रन्सचं आव्हान दिलं होतं. मुंबई इंडियन्सचा या टार्गेटचा निकारानं पाठलाग केला. पण, त्यांचा प्रतिकार कमी पडला. लखनौनं मुंबई इंडियन्सचा 12 रन्सनं पराभव केला. 

Apr 04, 2025 18:24 (IST)

Mumbai Rain News: मुंबईत अवकाळीचा धुमाकूळ! खोपोली, डोंबिवलीमध्ये जोरदार पाऊस

भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी 4 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4.45 वाजता जारी केलेल्या इशाऱ्यानुसार, रायगड जिल्ह्यातील काही भागांत पेण तालुक्यात पुढील 5.25 तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे.

हवामान खात्याने नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला असून, वादळी वाऱ्यांपासून व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

Apr 04, 2025 17:37 (IST)

LIVE Updates: मनसेच्या मराठी भाषेच्या आंदोलनाला कन्नड रक्षक वेदिकेचा पाठिंबा

महाराष्ट्र राज्यातील बँका आणि दुकानांमध्ये मराठी न बोलणाऱ्या उत्तर भारतीयांमुळे स्थानिक मराठी लोकांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेता, महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) महाराष्ट्रात चालवत असलेल्या संघर्षाला कर्नाटक रक्षण वेदिके पाठिंबा देते.

Apr 04, 2025 17:22 (IST)

LIVE Updates: दिनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाची चौकशी करु: CM देवेंद्र फडणवीस

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 

Advertisement
Apr 04, 2025 17:15 (IST)

LIVE Updates: वादळी वाऱ्याचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर लोकलवर परिणाम

वादळी वाऱ्याचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर लोकलवर परिणाम 

आटगाव आणि थानशेत स्टेशनच्या दरम्यान ओव्हर हेड वायर मध्ये पत्रा अडकला 

वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बाहेरून पत्रा उडून ओव्हर हेड वायर वर येऊन पडला 

यामुळे कसऱ्याहून कल्याणकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम 

एक लोकल पंधरा मिनिटे तर त्यामागे एक एक्सप्रेस 8 मिनिटे थांबली होती, 

पंधरा ते वीस मिनिटे वाहतूक सुरळीत होण्यास लागली

Apr 04, 2025 16:38 (IST)

LIVE Updates: केंद्र सरकारचे विदर्भ, मराठवाड्याला गिफ्ट! गोंदिया बल्लारशाह रेल्वे डबलिंगला मंजूरी

गोंदिया बल्लारशाह रेल्वे डबलिंगला मंजूरी 

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी 

गोंदिया भंडारा गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याला फायदा होईल

240 किमी मार्ग असेल 

29 स्टेशन, 36 ब्रीज, 338 लहान ब्रीज, 67 रेल्वे अंडर ब्रीजेस असतील.

मराठवाडा विदर्भ भागात आर्थिक विकास वेगात होईल. 

62 कोटी किलोग्राम दर वर्षी कार्बन डाय ॲाक्साईड वाचेल. जे अडीच कोटी झाडे लावल्या सारखं आहे. 

गोंदिया ते बल्लारशाह एक सेक्शनला मंजूरी

Advertisement
Apr 04, 2025 16:25 (IST)

Dharashiv News: मनिषा बिडवेचा फोन पोलिसांना सापडला, नवे खुलासे होणार?

धाराशिवच्या कळंब येथील मनीषा बिडवे हत्या प्रकरणातील मृत महिला मनिषा बिडवेचा फोन पोलिसांना सापडला

हत्या प्रकरणातील आरोपी रामेश्वर भोसले याच्या घरी सापडला फोन

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील उमरा गावात पोलीस आरोपीला घेऊन पोहोचले असता मिळून आला फोन

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात याच महिलेचा वापर करण्यात येणार असा दावा केल्याने चर्चेत आले आहे हत्या प्रकरण

मोबाईल फोन मधून काय पुरावे हाती लागणार ? याकडे लक्ष

Apr 04, 2025 16:22 (IST)

LIVE Updates: खोटारडेपणाचा निषेध... मंगेशकर हॉस्पिटलच्या अहवालावर अमित गोरखेंचा संताप

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा खोटारडेपणाचा तीव्र निषेध!

अतिशय चीड आणणारा आणि खोटेपणाने भरलेला अहवाल रुग्णालय प्रशासनाकडून सादर करण्यात आला आहे. हे सर्व केवळ स्वतःच्या चुकीला लपवण्यासाठी करण्यात आलेले केविलवाणे प्रयत्न आहेत.

या प्रकारामुळे निष्पाप रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना अनावश्यक वेदना सहन कराव्या लागत आहेत. ही केवळ रुग्णालय प्रशासनाची चूक नाही, तर मानवतेवरचा घाव आहे, अशा शब्दात भाजप आमदार अमित गोरखे यांनी संताप व्यक्त केला आहे. 

Advertisement
Apr 04, 2025 11:58 (IST)

महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांची आता खैर नाही, 12 एप्रिलला होणार मोठी घोषणा

महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांची आता खैर नाही

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त कायद्याची 12 एप्रिलला रायगड येथे होणार घोषणा 

खासदार उदयनराजे भोसले यांची माहिती

गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या माध्यमातून होणार घोषणा

Apr 04, 2025 11:38 (IST)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

पैठण, गंगापूर , वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, फुलंब्री तालुक्यात पावासाने हजेरी लावली

अचानक सुरु झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली होती

 

रब्बी हंगामातील मका, गहु, हरभरा, कांदा या पिकांना बसला फटका

Apr 04, 2025 11:37 (IST)

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरण, आरोग्य उपसंचालक करणार चार समितीय सदस्यांची नियुक्ती

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणी आरोग्य उपसंचालक राधाकिसन पवार करणार चार समितीय सदस्यांची नियुक्ती 

चार सदस्य समिती करणार दीनानाथ हॉस्पिटलची चौकशी 

यामध्ये एक स्त्री रोग तज्ञ यांचा समावेश 

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आरोग्य उपसंचालकांना फोनवरून सूचना 

समिती स्थापन करून करणार दीनानाथ हॉस्पिटलची आज पाहणी 

राधाकिसन पवार यांच्या अहवालावरून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर केली जाणार कारवाई

Apr 04, 2025 11:35 (IST)

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दीनानाथ हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून दीनानाथ हॉस्पिटलला कारणे दाखवा नोटीस 

महानगरपालिका आरोग्य प्रमुख नीना बोराडे पाठवणार नोटीस 

आरोग्य उपसंचालकाने स्थापन केलेल्या चार सदस्य समितीत निना बोराडे यांचा समावेश 

झालेला प्रकाराचा खुलासा दीनानाथ हॉस्पिटल कडून महानगरपालिका मागवणार

Apr 04, 2025 09:59 (IST)

ठाकरे गटाकडून राज्यातील 4 महानगर पालिकेवर ठेवलं जाणार विशेष लक्ष

ठाकरे गटाकडून राज्यातील 4 महानगर पालिकेवर ठेवलं जाणार विशेष लक्ष, मुंबई, पुणे, नाशिक आणि संभाजीनगर या महानगर पालिकेच्या प्रशासकांच्या कारभारावर असणार ठाकरे गटाचं विशेष वॉच

आगामी महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून नेते आणि उपनेत्यावर दिली जाणार विशेष जबाबदारी

येत्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत नेत्यांना आणि उपनेत्याना महानगर पालिकेच्या दृष्टीने जबाबदारी वाटप केले जाणार असल्याची सूत्रांची माहिती

Apr 04, 2025 09:15 (IST)

वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर देशभरात हायअलर्ट

वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर देशभरात हायअलर्ट

शुक्रवारच्या नमाजच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस सतर्क

दिल्ली पोलिसांनी सर्व संवेदनशील भागात सुरक्षा वाढवली 

जुनी दिल्ली, ईशान्य दिल्ली आणि शाहीन बाग या भागात पोलिसांचा फ्लॅग मार्च काढण्यात येणार

Apr 04, 2025 09:10 (IST)

वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून अवकाळी अधून-मधून कोसळणाऱ्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. या पावसाचा फटका हळद, बीजवाई, कांदा आणि ज्वारी पिकांना बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली असून प्रशासनाने नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली जात आहे.

Apr 04, 2025 09:07 (IST)

सोलापुरात 600 घंटागाडी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन

सोलापुरात 600 घंटागाडी कर्मचाऱ्यांचं विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन

घंटागाडी कामगारांचं आजपासून बेमुदत धरणे आंदोलन

घंटागाडी कर्मचाऱ्यांना प्रचंड आरोग्याच्या प्रश्नाला समोर जावे लागत आहे

किमान वेतन मिळालं पाहिजे तसेच आरोग्याच्या सोयी-सुविधा दिल्या गेल्या पाहिजे यासाठी सुरू आहे आंदोलन

जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत सोलापूर शहरातील घंटागाडी कामगार काम बंद करणार

या आंदोलनामुळे आता सोलापुरातील स्वच्छतेचा प्रश्न समोर येत आहे

Apr 04, 2025 09:05 (IST)

नागपूरच्या मानकापूर परिसरात भररस्त्यात एकाची हत्या

नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बाजार परिसरात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. घटनेत सोहेल खान याचा मृत्यू झाला असून याप्रकरणी पोलिसांनी तिघांना केली अटक. 

गोळीबाराच्या घटनेनंतर जखमी सोहेल खान याला उपाचारासाठी मेयो हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचारादरम्यान जखमी सोहेलचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सोहेल याच्या नातेवाईकांनी मेयो हॉस्पिटलसमोर गोंधळ घातला. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

Apr 04, 2025 09:00 (IST)

नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका

नाशिक जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.  30 गावांमधील 1 हजार 990 शेतकऱ्यांचे 1298 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. सर्वाधिक नुकसान कांद्याचे झाले असून 1 हजार 175 हेक्टरवरील कांदा झाला जमिनोदोस्त. आधीच कांद्याला भाव मिळत नसून शेतकऱ्यांसमोर अवकाळीचे ओढावले दुहेरी संकट. 

कांद्यापाठोपाठ 60 हेक्टर वरील भाजीपाला, 20 हेक्टर वरील द्राक्ष, 20 हेक्टरवरील डाळिंब आणि इतर पिकांचे नुकसान.   कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालातून ही माहिती समोर आली असून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून मदत दिली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे.