पालेभाज्यांच्या दरात रेकॉर्डतोड वाढ; दर 400 पार, कोथिंबिरीला गावठी कोंबडीचा भाव

गेल्या महिन्यापासून पालेभाज्यांचे दर वधारले आहेत. अनेक घरांमध्ये ताटातून मेथी, कोंथिबीर बेदखल झाल्याचं दिसत आहे.

Advertisement
Read Time: 1 min
नाशिक:

गेल्या महिन्यापासून पालेभाज्यांचे दर वधारले आहेत. अनेक घरांमध्ये ताटातून मेथी, कोंथिबीर बेदखल झाल्याचं दिसत आहे. दरम्यान काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असताना पालेभाज्यांच्या दरात रेकॉर्ड तोड वाढ झाली आहे. ऐरवी 20 ते 30 रुपयांना मिळणारी कोथिंबीर दोनशे रुपयांहून जास्त किमतीने विकली जात आहे. त्यामुळे कोथिंबीरीला गावठी कोंबडीचा भाव आल्याचं म्हटलं जात आहे. 

पालेभाज्यांच्या भावात रेकॉर्ड करणारी बातमी आहे. नाशिकच्या बाजारात कोथिंबीर 450 रुपयाला तर मेथी 250 रुपयाला जुडी विकली जात आहे. यंदाच्या वर्षी नाशिकमध्ये कोथिंबीरीला विक्रमी भाव मिळाला आहे. गावठी कोथिंबिर सर्वाधिक 450 रुपये जोडी भाव मिळाले आहेत. तर सरासरी 100 रुपये ते 450 पर्यंत जुडीला मिळत आहे. 

हे ही वाचा - लाडक्या बहिणींसाठी Good News, मुदतवाढ अन् 4500 रुपये थेट खात्यात; शासनाचा मोठा निर्णय

कोथिंबीरीसह इतरही पालेभाज्यांच्या दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पालेभाज्यांची आवक घटल्याने दर वाढल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. यंदा अनेक भागांमध्ये चांगला पाऊस पडला. नाशिकलाही गेल्या महिनाभरात मुसळधार पावसाचा सामना करावा लागला. याचा परिणाम पालेभाज्यांवर झाला आहे. जास्त पावसामुळे कोथिंबीराच्या पिकाचं नुकसान होतं. परिणामी कोथिंबीरीने महिलांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.