जाहिरात

लाडक्या बहिणींसाठी Good News, मुदतवाढ अन् 4500 रुपये थेट खात्यात; शासनाचा मोठा निर्णय 

यापूर्वी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 ऑगस्ट देण्यात आली होती.

लाडक्या बहिणींसाठी Good News, मुदतवाढ अन् 4500 रुपये थेट खात्यात; शासनाचा मोठा निर्णय 
मुंबई:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्यभरातील मोठ्या संख्येने महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दरम्यान राज्य सरकारकडून महिलांसाठी खूशखबर आहे. यापूर्वी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 ऑगस्ट देण्यात आली होती. मात्र प्रशासनाने यात मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला असून सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिला अर्ज करू शकतील. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

सध्या अनेक महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधन सणापूर्वीच सरकारने महिलांच्या बँक खात्यात 3 हजार रुपये वर्ग केल्यामुळे इतर महिलांचाही मोठा प्रतिसाद योजनेला दिसून येत आहे. यापूर्वी 31 ऑगस्टपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येत होता, आता सरकारने ही मुदत आणखी वाढवली असून 30 सप्टेंबरपर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांना तीन महिन्यांचे एकूण 4500 रुपये मिळणार आहेत. 

हे ही वाचा - PAN कार्डमध्ये असतो तुमच्या नावाचाही समावेश, काय असतो नंबरचा अर्थ?

4500 रुपये कोणाला मिळणार?
ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केलेत आणि त्यांचे अर्ज मंजूर झालेत, आणि पहिल्या लाभ न मिळालेल्या महिलांना दुसऱ्या टप्प्यात एकत्रितपणे 4500 रुपये मिळतील. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे एकत्रितपणे 4500 रुपये खात्यात जमा होतील. दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आहे. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
CM Eknath Shinde : 'मला काही सांगायचंय...'; चित्रपटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रंगमंचावर!
लाडक्या बहिणींसाठी Good News, मुदतवाढ अन् 4500 रुपये थेट खात्यात; शासनाचा मोठा निर्णय 
leafy vegetables cost increased Coriander sold at Rs 450 pair methi 250 in Nashik market
Next Article
पालेभाज्यांच्या दरात रेकॉर्डतोड वाढ; दर 400 पार, कोथिंबिरीला गावठी कोंबडीचा भाव