मोत्यांची शेती कशी करतात? यशस्वीरित्या व्यवसाय सांभाळणाऱ्या 'ती'कडून जाणून घेऊ

मोती नेमके कसे तयार होतात आणि या मोत्यांची शेती कशी होते या संदर्भात जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न. 

जाहिरात
Read Time: 4 mins
नाशिक:

प्रतिनिधी, भाग्यश्री आचार्य प्रधान

नऊवारी साडी असो किंवा पारंपारिक सण मोत्यांचे दागिने वापरणे महिला अधिक पसंत करतात. इतकेच नव्हे तर साड्या किंवा ड्रेसपीस, पुरुषांचे कुर्ते यावर देखील बऱ्याचदा मोत्यांची एम्ब्रॉयडरी केलेली पाहायला मिळते. मात्र हे मोती नेमके कसे तयार होतात आणि या मोत्यांची शेती कशी होते या संदर्भात जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न. 

नाशिक येथे स्थायिक असणाऱ्या पूजा भानुशाली यांनी जवळपास दोन वर्ष हा व्यवसाय यशस्वीपणे सांभाळत आहे. सुरुवातीला कपड्यांच्या व्यवसायात असणाऱ्या पूजा भानुशाली यांना संधिवाताचा त्रास सुरू झाला. एकीकडे तब्येत बरी नाही आणि दुसरीकडे काहीतरी करण्याची इच्छाशक्ती त्यांना शांत बसू देत नव्हती. घरात बसून सतत औषधं खाल्ल्याने त्यांना नकारात्मक वाटत असे. मात्र त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्यांना घरी बसू नका काहीतरी करा. तुम्ही मोत्यांची शेती का करत नाही असे सुचविले. त्यानंतर त्यांनी मनावर घेत ही शेती करण्यासाठी काय लागते याचा अभ्यास केला आणि कोरोनाच्या आधी त्यांनी आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. पहिलं प्रोडक्शन त्यांनी यशस्वीरीत्या केल्यानंतर कोरोनाची लाट आली. अख्ख्या जगाबरोहर त्यांचाही व्यवसाय थांबला. मात्र कोरोना आधीच त्यांनी जवळपास 4000 मोत्यांची निर्मिती केली होती. त्यामुळे तसं पाहता त्यांचं नुकसान झालं नाही. कोरोनानंतर त्यांनी पुन्हा हा व्यवसाय सुरू केला. घाटकोपर येथे उद्योजकांसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाल्या. तिथे केलेल्या सादरीकरणात त्या अव्वल ठरल्या आणि बक्षीस मिळवले. हाच त्यांचा टर्निंग पॉइंट ठरला अशी माहिती पूजा यांनी दिली
  
व्यवसाय म्हटला की पैशांची जुळवा जुळव आलीच. कमीत कमी पैशात व्यवसाय उभारावा यासाठी त्यांनी नाशिकमधील शेतकऱ्यांची तळी आपण भाड्याने घ्यायचे ठरवले. यावेळी त्यांना नाशिकमधील शेतकरी अरुण मापरी यांचे तळे भाड्याने द्यायचे असल्याचे समजले. त्यांनी मापरी यांना संपर्क साधत हे तळे वर्षभरासाठी भाड्याने एक लाखाला विकत घेतले. त्यानंतर त्यांनी जवळपास दोन ते तीन वेळेला मोत्यांची निर्मिती केली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - ना सोशल मीडिया, ना ऑनलाइन अपडेट; दूरदर्शनवर कार्यक्रमांची अशी दिली जायची माहिती

ही मोत्यांची निर्मिती करताना कालव्यांची गरज असते. या कालव्यांमध्ये न्यूक्लिअर टाकल्यानंतर ज्या आकारात आपल्याला मोती हवा आहे त्या आकारात मोती मिळतो. या सगळ्या प्रक्रियेला 18 महिने लागतात. मोत्यांची शेती करताना सुरुवातीला कालव्यांमध्ये न्यूक्लिअर टाकण्यासाठी पाच ते सात दिवसांचे कष्ट घ्यावे लागतात. त्यानंतर प्लास्टिकच्या बाटल्यांना जाळी लावून शिंपले जाळ्यात ठेवले जातात. त्यानंतर ही जाळी पाण्यामध्ये सोडली जातात.  आणि पुढची जी प्रक्रिया असते ती संपूर्णपणे नैसर्गिक असते. शिंपल्यामधील जीव आपल्या नैसर्गिक पद्धतीने एक चिकट द्राव स्त्रवतात. हा द्राव ज्यावेळी न्यूक्लियर वर जाऊन जमा होतो त्यावेळी त्यातून मोत्यांची निर्मिती होते, अशी माहिती भानुषाली यांनी दिली. हे शिंपले किंवा कालवे भारताच्या विविध ठिकाणाहून मागवले जातात. त्यानंतर त्यावर प्रक्रिया केली जाते. मोती बनल्यानंतर ते काढले जातात आणि कापसामध्ये पॅकिंग करून ते वेगवेगळ्या ज्वेलर्सकडे पाठवले जातात. त्यानंतर हे ज्वेलर्स एका विशिष्ट पद्धतीने शिंपल्यातील मोती काढून विक्री करतात. भानुषाली यांच्याकडील मोती जयपूर हैदराबाद अशा विविध ठिकाणी विक्रीसाठी जात असल्याचे त्या सांगतात. 

Advertisement

मुंबईची असल्याने शेतावर येण्याची सवय नव्हती. त्यातच मी सुरुवातीला मुंबई नाशिक येजा करत असे. त्यानंतर नाशिक येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. यासाठी मला पती आणि मुलांनी देखील पाठिंबा दिला. मात्र नाशिक वरून देखील सिन्नर पर्यंत येण्यासाठी कष्ट पडत असे सुरुवातीला दोन ते तीन वेळा माझा अपघात देखील झाला. पण मी हरले नाही आणि घेतलेली जबाबदारी पूर्ण नेटाने पार पाडली असे पूजा सांगतात.

Advertisement

या शिंपल्यांना शेवाळा सारखे नैसर्गिक पद्धतीचे खाणे महिन्यातून दोनदा द्यावे लागते आणि मधूनच मोती तयार होतोय की नाही हे पाहण्यासाठी ते उघडून बघावे लागते. नाशिकमध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपली शेततळी अशा पद्धतीने भाड्याने दिली आहेत. त्यामुळे मोत्यांची शेती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना देखील आधार मिळाला आहे. गेल्या दोन वर्षापासून पूजा भानुषाली या माझ्या शेततळ्यात मोत्यांची शेती करतात. शेततळ्यातील पाणी हे नदीचे आणि विहिरीचे असल्याने कालव्यांना कोणतेही नुकसान होत नाही. पाण्यात जरी शिंपले सोडलेले असले तरी हे पाणी कोणत्याही  शिंपले सोडलेले असले तरी त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल नाही. हे पाणी मी माझ्या शेताला देखील वापरतो असे शेतकरी अरुण मापरी सांगतात. साधारण एक मोती 200 ते 300 रुपयांना विकला जातो. त्या प्रमाणात अर्थकारण देखील सुरू असतं. तुम्ही कितीही शिंपले शेततळ्यात टाकू शकता जितके शिंपले असतील तितके सगळे शिंपले मोती देतात असे नाही त्यातील काही शिंपले मरण देखील पावतात. त्यामुळे शिंपल्यांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. नाहीतर मोठ्या नुकसानाला देखील सामोरे जावे लागू शकते असे त्या सांगतात. 

त्यामुळे कोणत्याही व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर येणाऱ्या अडचणींवर मात करावी लागते. स्वतःवर विश्वास ठेवत धीर धरावा लागतो. त्यानंतर यश आपल्या हातात येते. पूजा भानुशाली यांनी अनेक अडचणींवर मात करत त्या आज कल्चर पर्ल शेतीमध्ये यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला येत आहेत.