21 hours ago

Live News Updates : मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्लू चालकाने भररस्त्यात अश्लील कृत्य केल्याचा प्रकार पुण्यातील येरवडा परिसरातून समोर आला होता. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यांतर संताप व्यक्त केला जात होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणांचा शोध सुरु केला. अखेर गौरव आहुजा या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो गायब झाला होता. त्यानंतर त्याचा माफीनाम्याचा व्हिडीओ समोर आला होता. 

Mar 09, 2025 17:14 (IST)

गौरव आहुजासह भाग्येश ओसवाल यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी

पुणे येरवडा प्रकरणातील दोन्ही आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  पुणे पोलिसांकडून सात दिवसांची कोठडी न्यायालयाला मागण्यात आली होती. आरोपी गौरव आहुजा व भाग्येश ओसवाल यांना आता 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.  उद्या पुन्हा दोन्ही आरोपींना कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. गौरव आहुजा याने अश्लील कृत्य भर रस्त्यात केले होते. 

Mar 09, 2025 15:32 (IST)

नागपाडा येथे टाकी साफ करणाऱ्या 4 कामगारांचा मृत्यू

नागपाडा येथे टाकी साफ करणाऱ्या 4 कामगारांचा मृत्यू झाला आहे.  खाजगी इमारतीच्या पाण्याच्या टाकीची साफसफाई करताना ही दुर्घटना घडली आहे.  हे सर्व जण कंत्राटी कामगार होते. अग्निशमन दलाच्या मदतीने  सर्वांचे मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहेत. यात एकाची स्थिती गंभीर आहे. 

Mar 09, 2025 14:56 (IST)

शिवसेना नेते महेश गायकवाड यांना पत्राद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी

महेश गायकवाड यांना पत्राद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी

गणपत गायकवाड आणि वैभव गायपत्रा यांचे नाव घेऊ नको नाहीतर तुझा बाबा सिद्दिकी करू असा त्या पत्रात मजकूर

एका लग्न समारंभात एका तरुणाने महेश गायकवाड यांच्या हातात  दिला लिफाफा

धमकी पत्राच्या कागद जेलमध्ये वापरला जात असल्याच्या महेश गायकवाड यांचा दावा

धमकी प्रकरणात अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Mar 09, 2025 13:30 (IST)

Chhatrapati Sambhajinagar : वाल्मीक कराडला फाशीच्या मागणीसाठी पैठणमध्ये कडकडीत बंद

 संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक करायला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज छत्रपती संभाजी नगरच्या पैठणमध्ये बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे सकाळपासून पैठण शहरात कडकडीत बंद पाहायला मिळत आहे.

Advertisement
Mar 09, 2025 12:42 (IST)

पुणे-बंगलोर हायवेवर कारची कंटेनरला धडक, दोन महिलांचा जागीच मृत्यू

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचवड गावच्या हद्दीत बंद पडलेल्या कंटेनरला  साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या भरधाव इनोव्हा कारने जोरदार धडक दिली.  कारमधील दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. सलमा मोमीन आणि महिदा शेख अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दोन्ही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात हलविले आहेत आहे.

Mar 09, 2025 11:51 (IST)

सतीश उर्फ खोक्या भोसले शिरूर कासारमध्ये आंदोलन

बीड : शिरूर कासार येथे सतीश उर्फ खोक्या भोसले याला अटक करण्यासाठी आंदोलकांचा तासाभरापासून ठिय्या 

शिरूर कासारच्या पोलीस ठाण्यासमोर आंदोलन 

ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे नंतर प्राध्यापक लक्ष्मण हाके देखील शिरूर कासारमध्ये दाखल 

वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत खोक्यावर गुन्हा दाखल करावा अशी केली जात आहे मागणी 

खोक्याला तात्काळ अटक करावी या मागणीसाठी केले जात आहे आंदोलन

Advertisement
Mar 09, 2025 11:06 (IST)

Bhandara News : चारित्र्याच्या संशयावरुन पतीचा पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला

भंडाऱ्याचा तुमसर शहरातील रामकृष्ण नगरात पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत गळ्यावर दोन्ही बाजूने धारदार चाकूने वार करून प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. कुंदा भुपेंद्र पाहुणे (२५), रा. रामकृष्ण नगर, तुमसर असे प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तर भुपेंद्र पाहुणे (३५) रा. रामकृष्ण नगर, तुमसर, असे आरोपी पतीचे नाव आहे.

Mar 09, 2025 09:48 (IST)

Nashik Crime: नाशिकच्या कॉलेज रोडवरील संत कबीर नगर परिसरात युवकाची हत्या

नाशिकच्या कॉलेज रोडवरील संत कबीर नगर परिसरात युवकाची टोळक्याकडून हत्या

अरुण बंडी राहणार कामगार नगर सातपूर असे मृत झालेल्या युवकाचे नाव

जुन्या वादातून अरुणची हत्या केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती

हल्ला करून हल्लेखोर झाले फरार नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अधिक तपासून

Advertisement
Mar 09, 2025 09:24 (IST)

रत्नागिरीत 'टेस्ला' सारखा प्रकल्प आणणार : आमदार किरण सामंत

रत्नागिरीत 'टेस्ला' सारखा प्रकल्प आणण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याची माहिती आमदार किरण सामंत यांनी दिली आहे. कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी हे मुंबईनंतर रेल्वे, विमान, जल व रस्ते अशा चारही वाहतुकीच्या सुविधा असणारे एकमेव ठिकाण आहे. यासाठीच आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून टेस्लासारखा इलेक्ट्रिकल व्हेईकल निर्मितीचा कारखाना जिल्ह्यात आणण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही आपल्याला पाठिंबा दर्शवला असल्याने हा प्रकल्प जिल्ह्यात आणण्यात आपल्याला निश्चित यश येईल. टेस्लासारखा आंतरराष्ट्रीय प्रकल्प आल्यास जिल्ह्याचा कायापालट होईल, असा विश्वास आमदार किरण सामंत यांनी येथे व्यक्त केला.

Mar 09, 2025 08:54 (IST)

मुंबईतील अंधेरी परिसरात गॅस पाइपलाइनला गळती, दोघे जखमी

मुंबईतील अंधेरी परिसरात गॅस पाइपलाइनला गळती लागल्याने आग लागली. त्यात तीन जण जखमी झाले. या घटनेत दोन वाहनांचेही नुकसान झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.अंधेरी (पूर्व) भागातील तक्षशिला येथील गुरुद्वाराजवळील शेर-ए-पंजाब सोसायटीमध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडच्या पाइपलाइनमधून शनिवारी सकाळी 12.35 वाजता ही आग लागली. आगीमुळे दोन गाड्या जळून खाक झाल्या.

Mar 09, 2025 08:52 (IST)

मुंबईतील अंधेरी परिसरात गॅस पाइपलाइनला गळती, दोघे जखमी

Mar 09, 2025 08:42 (IST)

MNS News : राज ठाकरेंकडून मनसे कार्यकर्त्यांना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

 राज ठाकरेंकडून मनसे कार्यकर्त्यांना पक्षाच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा

Mar 09, 2025 08:40 (IST)

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत सर्वधर्मीय निषेध मोर्चा

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत सर्वधर्मीय निषेध मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. हा सर्वधर्मीय मोर्चा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाला बारामतीतील कसबा या ठिकाणी सुरुवात होईल आणि त्याची सांगता बारामतीतील नगरपालिकेसमोर होणार आहे. या मोर्चासाठी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख हे उपस्थितीत राहणार आहेत. सकाळी नऊ वाजता या मोर्चाला सुरुवात होईल.