भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या इशाऱ्यानुसार, पुढचे 72 तास महाराष्ट्र, विशेषतः मुंबई, पुणे आणि कोकणासाठी धोक्याचे ठरण्याची शक्यता आहे. शुक्रवारी संध्याकाळी (26 सप्टेंबर) हवामान विभागानं हा इशारा दिला आहे. राज्यात पावसाचा मुक्काम दसऱ्यानंतरही राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील जिल्ह्यांसाठी 26 ते 29 सप्टेंबर या कालावधीत ऑरेंज आणि रेड अलर्ट जाहीर करण्यात आले आहेत.रायगड आणि पुणे घाटमाथा या संवेदनशील भागांसाठी 28 सप्टेंबर रोजी 'रेड अलर्ट' असल्याने, या जिल्ह्यांवर सर्वाधिक लक्ष ठेवण्यात येत आहे. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी ठाणे, मुंबई आणि रत्नागिरीतही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Rains Live Update : जळगावच्या हतनूर धरणाचे 8 दरवाजे उघडले
Maharashtra Rains Live Update : जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणातून 33 हजार 337 क्यूसेक पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली मध्यरात्री किंवा पहाटे धरणातून अजूनही पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
Maharashtra Rains Live Update: पुणेकपांनो, सावधान! खडकवासला धरणातील विसर्ग वाढवला
पुण्यातील खडकवासला धरणातील विसर्ग वाढवण्यात आला.घाटमाथ्यावर सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे विसर्ग वाढवण्यात आला. 6 हजार 864 क्युसेक पाण्याचा विसर्ग रात्री 9 पासून खडकवासला धरणातून करण्यात येणार आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर विसर्ग वाढवण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने व्यक्त केली आहे.
Maharashtra Rains Live Update: वर्ध्यात पुरात अडकलेल्या 30 जणांना पोलिसांनी वाचवलं
Maharashtra Rains Live Update: वर्ध्याच्या वडगाव सावंगी रस्त्यावरील पुरात अडकलेल्या 30 जणांना पोलीसांनी सुखरुप बाहेर काढलं. समुद्रपुर तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने नदी नाले भरून वाहत आहेत. त्यातच दर्शनासाठी गेलेले भाविक तसेच शाळकरी विद्यार्थी येथील पुरामुळे अडकले होते. त्यांना पोलिसांनी दोर बांधून त्यांना यशस्वीपणे बाहेर काढले.
LIVE Updates: हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील कोंढुर डिग्रस गावातील शाळेमध्ये शिरलं पुराचे पाणी
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील कोंढुर डिग्रस गावातील शाळेमध्ये शिरलं पुराचे पाणी..
गावातील मंदिर त्याचबरोबर अनेक घरांमध्ये शिरलं कयाधू नदीच्या पुराचं पाणी..
कोंडूर डिग्रस गावाचा कळमनुरी शहराशी संपर्क तुटला..
पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावातील जनजीवन विस्कळीत..
Latur Rain Updates: अहमदपूर शहरातील बुरुड गल्लीत अनेक घरांमधे शिरले पाणी
लातूरच्या अहमदपूर शहरातील बुरुड गल्ली भागात अनेक घरांमधे पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांनी रात्र जागून काढली आहे. तर राशन भिजल्याने उपासमारीची वेळ आल्याचे पहायला मिळत आहे. आज दुपारनंतरही घरात गुडघाभर पाणी आहे. मोटरीच्या सहाय्याने पाणी काढण्याचा प्रयत्न केला जात आहे पण अर्ध्या तासात पुन्हा तेवढेच पाणी जमा होत असल्याने नागरिक हवालदील झाले आहेत. तर दुसरीकडे नगर परिषद कार्यालयात शुकशुकाट असल्याचं पहायला मिळत आहे.
LIVE Updates: छत्रपती संभाजीनगरसह परिसरात पावसाला सुरुवात
छत्रपती संभाजीनगरसह परिसरात पावसाला सुरुवात
हवामान विभागाकडून आज मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचा वर्तवण्यात आला होता अंदाज
मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची असेल
मराठवाड्यात गेल्या चार दिवसापासून अतिवृष्टीच्या पावसाने थैमान घातले आहे
आज दुपारी पुन्हा जोरदार पावसाने हजरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
LIVE Updates: छत्रपती संभाजीनगरसह परिसरात पावसाला सुरुवात
छत्रपती संभाजीनगरसह परिसरात पावसाला सुरुवात
हवामान विभागाकडून आज मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचा वर्तवण्यात आला होता अंदाज
मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची असेल
मराठवाड्यात गेल्या चार दिवसापासून अतिवृष्टीच्या पावसाने थैमान घातले आहे
आज दुपारी पुन्हा जोरदार पावसाने हजरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
LIVE Updates: छत्रपती संभाजीनगरसह परिसरात पावसाला सुरुवात
छत्रपती संभाजीनगरसह परिसरात पावसाला सुरुवात
हवामान विभागाकडून आज मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचा वर्तवण्यात आला होता अंदाज
मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची असेल
मराठवाड्यात गेल्या चार दिवसापासून अतिवृष्टीच्या पावसाने थैमान घातले आहे
आज दुपारी पुन्हा जोरदार पावसाने हजरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
Parbhani News: 1 लाख 90 हजार क्यूसेकने निम्न दूधना प्रकलपातून विसर्ग!
परभणीच्या निम्न दूधना प्रकलपाचे 16 चे 16 दरवाजे उघडले असून यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे, यातून 5387.56 Cumec: (190259 Cusec) ने एवढा विसर्ग सुरु आहे, प्रशासनातर्फे आधीच पूर आलेल्या गावांना मदत कार्य पोहोचवण्यात आले असून सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे....
Pune LIVE Updates: पुरंदर भागात परतीच्या पावसाचा जोर वाढला
पुण्याच्या इंदापूर बारामती पुरंदर दौंड तालुक्यात काल दुपारपासून परतीच्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरला आहे. सर्वच भागात पावसाची संततधार सुरू आहे.अद्यापही पाऊस थांबायचं नाव घेत नाही अशी स्थिती आहे. काल दुपारपासून सुरू झालेल्या या पावसामुळे इंदापूर तालुक्यातील ओढे नाले भरून वाहू लागले आहेत.शेता शेतात पाणी साचले.पुणे सोलापूर मार्गावरून इंदापूर तालुक्यातील बाबुळगाव ला जाणाऱ्या रस्त्यावरील ओढा तुडुंब भरून वाहू लागलाय.
Washim News: मुसळधार पावसामुळे मोहरी गावचा तालुक्याशी संपर्क तुटला
वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील मोहरी गावचा नाल्याला पूर आला आहे. नाल्यावरून पाणी पुलावरून वाहत असल्याने गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. यामध्ये काही नागरिकाणी पूर पाहण्यासाठी गर्दी केली असून नाल्याकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Washim News: मुसळधार पावसामुळे मोहरी गावचा तालुक्याशी संपर्क तुटला
वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील मोहरी गावचा नाल्याला पूर आला आहे. नाल्यावरून पाणी पुलावरून वाहत असल्याने गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. यामध्ये काही नागरिकाणी पूर पाहण्यासाठी गर्दी केली असून नाल्याकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Live Updates: तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पुरग्रस्तांना 1 कोटींची मदत
तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आता पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आलं आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने १ कोटी रुपये तर तेरणा ट्रस्टच्या वतीने ५१ लाख रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येत आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची जमीन खरवडून गेली आहे, ज्यांचे अतीव नुकसान झाले आहे त्यांना देखील वेगळी मदत मंदिर संस्थान आणि तेरणा ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे. मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे यंदा मराठवाड्यावर अभूतपूर्व संकट ओढवलं आहे. यावेळी तेरणा ट्रस्ट आणि तुळजाभवानी मंदिर संस्थान संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीला धावून आलं आहे.
LIVE Updates: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला
मोहोळ तालुक्यातील वडवळ गावच्या शेतकऱ्यांनी ताफा अडवत कृषी मंत्र्यांसमोर मांडल गाऱ्हाणं
वडवळच्या काळेवस्ती पर्यंत अद्याप कोणतीही खाण्यापिण्याचे साहित्य पोहचले नसल्याची गावकरी शेतकऱ्यांनी केली तक्रार
यावेळी अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावात घुसून पंचनामे करण्याच्या कृषी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी केल्या सूचना
वडवळच्या काळे वस्तीत अद्याप बिस्कीटचा एक पुडा ही पोहचला नसल्याची शेतकऱ्यांनी केली तक्रार
दरम्यान यावेळी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना कृषी मंत्र्यांसमोर अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरल्याच दिसून आलं.
LIVE Updates: राज्यातील देवस्थान ट्रस्टना आमदार अभिजीत पाटील यांचे साकडे
माढा तालुक्यातील पूर बाधित शेतकरी बारा बलुतेदार यांच्या मदतीसाठी आता राज्यातील सिद्धिविनायक , शिर्डी सारख्या देवस्थान यांनी आपल्या दानातील दान मदतीसाठी द्यावी. असे साकडे माढाचे आमदार अभिजीत पाटील यांनी घातले आहे.
माढा तालुक्यातील 16 गावांना पुराचा जोरदार फटका बसला आहे. अनेक जण शेल्टर कॅम्प मध्ये आश्रयाला आहे. घरात चिखल गाळ झाला आहे. जे साहित्य राहिले होते ते सर्व पाण्यात भिजले आहे. वाहून गेले आहे. त्यामुळे शिर्डी, लालबाग, सिद्धीविनायक, दगडूशेठ या देवस्थान ट्रस्ट यांनी आता पूर बाधितांच्या मदतीला यावे असे साकडे आमदार अभिजीत पाटील यांनी घातले आहे
Solapur News: सोलापुरला पुन्हा पुराचा धोका! सीना नदीत पूर येण्याची दवंडी
सोलापुरातील सीना नदीत पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरु
मोहोळ, अक्कलकोट तालुक्यातील गावागावात दवंडी देण्यात येत आहे
सीना नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची दवंडी हलगी वाजवत देण्यात येत आहे
सिना- कोळेगाव धरणातून , खासापुरी आणि चांदणी प्रकल्पतून 75 हजार 817 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु
भूम परांडा तसेच अहिल्यानगर मध्ये पाऊस वाढल्याने विसर्ग सुरू
सीना नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली
Beed News: बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर
बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर
पुराच्या पाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने
दगडी पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद
मध्य रात्र झालेल्या जोरदार पावसामुळे बिंदुसरा नदी दुथडी भरून वाहत आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Nanded Rain : नांदेडमधील २५ महसूल मंडळात अतिवृष्टी
नांदेडमधील २५ महसूल मंडळात अतिवृष्टी
१२ मंडळात १०० मिलिमिटर पेक्षा अधिक पाऊस
लोहा तालुक्यात सर्वाधिक सरासरी १२१ मिमी पाऊस
Nanded News: नांदेड येथून तेलंगणाकडे जाणारा रस्ता बंद
नांदेडमध्ये पहाटेपासून पावसाची संततधार सुरु
जिल्ह्यातील नदी नाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत
मागच्या 2 तासांपासून पाऊस पूर्णपणे थांबला आहे
पण अद्याप पाण्याचा निचरा झाला नाही
नांदेड येथून तेलंगणा राज्याच्या दिशेने जाणारा रस्ता वाका या गावाजवळ एकाबाजूने बंद
तर दुसऱ्या बाजूने वाहतूक धीम्या गतीने सुरू
Pune News: उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सुरू असलेला विसर्ग वाढवला
Pune News: उजनी धरणातून भीमा नदी पात्रात सुरू असलेला विसर्ग वाढवला. सकाळी 10 वाजल्यापासून उजनीतून भीमापात्रात 91 हजार 600 क्युसेकने विसर्ग सुरू. नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पूर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी उजनीतून भीमा पात्रात विसर्ग.
Beed News: बीडच्या पाटोदा तालुक्यात जोरदार पाऊस
बीडच्या पाटोदा तालुक्यात जोरदार पाऊस
रात्रीपासून मुसळधार पावसाने अनेक गावांमध्ये शेतात पाणी साचायाला सुरुवात
Beed Rain Update: बीडमध्ये जोरदार पाऊस, बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये शिरलं पाणी
बीड जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वरत होत असतानाचा मध्यरात्री पुन्हा जोरदार पावसाने धुमाकुळ घातला आहे. अनेक सखल भागात पाणी शिरले असून बीडचे ग्रामीण पोलीस ठाण्यात पाणी शिरले आहे. संपूर्ण पोलीस ठाणे पाण्याखाली गेल्याने सकाळपासून कामकाज बंद आहे. ठाण्यात शिरलेले पावसाचे पाणी बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांचे युद्धपातळीवर कार्य सुरू आहे
बीड : माजलगाव धरणाचे 11 तर मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले
बीड : धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे पाण्याची आवक पाहता माजलगाव आणि मांजरा धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गेल्या दोन दिवसापासून हा विसर्ग बंद करण्यात आला होता.मात्र आता पुन्हा एकदा आता माजलगाव धरणातून सिंदफणा नदी पात्रात धरणाचे 11 दरवाजे उघडत 42000 क्यूसेक ने विसर्ग केला जात आहे. तर केज मधील धनेगाव येथील मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडत नदीपात्रात 27166 क्युसेक ने विसर्ग केला जात आहे. यामुळे सिंदफणा आणि मांजरा नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Solapur rain : अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपलं
सोलापूर: अक्कलकोट तालुक्याला पावसाने झोडपलं
तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु
सतत पडत असलेल्या पावसाने तालुक्यातील नद्या-नाले तुडुंब
खैराट गावाजवळील ओढा झाला ओव्हरफ्लो; ग्रामीण भागातील रस्ते गेले पाण्याखाली
खैराट गावातील ओढा ओव्हर-फ्लो झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांना पाण्यातून काढावी लागत आहे वाट
तालुका प्रशासनाने दिला आहे सतर्कतेचा इशारा
Hingoli Rain: हिंगोली जिल्ह्यात पुन्हा पावसाचा हाहाकार
हिंगोली जिल्ह्यात पुन्हा पावसाचा हाहाकार
हिंगोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता.
कळमनुरी तालुक्यातील कोंढुर दिग्रस गावाला भिडलं पुराचे पाणी
पावसाचा जोर असाच राहिल्यास गावात पाणी शिरण्याची शक्यता
कळमनुरी तालुक्यातील कोंढुर डिग्रस गावाचा संपर्क तुटला
Dharashiv Rain : धाराशिव जिल्ह्यातील कळंब बाजारपेठेत शिरलं पाणी
धाराशिव जिल्ह्यातील कळंब बाजारपेठेत शिरलं पाणी
धाराशिव जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ म्हणून कळंब बाजारपेठेची ओळख
बाजारपेठेतील रस्त्यांना आलं नदीचे स्वरूप
अनेक व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरून नुकसान
धाराशिव जिल्ह्यातील सर्वच तालुक्याला पावसानं काल रात्रीपासून झोडपलं
मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीला पूर
मराठवाडा विदर्भाच्या सीमेवर असलेल्या पैनगंगा नदीला पूर
पुसद - हिंगोली महामार्गावरील वाहतूक बंद
विदर्भातील पुसद आणि हिंगोली जिल्ह्याचा संपर्क तुटला
पैनगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी फिरण्याची शक्यता
Satara Rain : सातारा शहरात पहाटेपासून पावसाला सुरुवात
सातारा शहरात पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढत चाललाय. हवामान खात्याने साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, त्यानुसारच पावसाचा तडाखा जिल्ह्यात पाहायला मिळतोय.
घाटमाथा परिसरातही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. या वाढत्या पावसामुळे कोयना धरणाचे दरवाजे पुन्हा उघडावे लागले आहेत.
धरणाचे दोन वक्र दरवाजे एक फूट उचलण्यात आले असून, यातून तब्बल 3 हजार 200 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.
Rain Update: मराठवाडा, विदर्भात पुढील 3-4 तास मुसळधार पावसाचा अंदाज
मराठवाडा, विदर्भात पुढील 3-4 तास मुसळधार पावसाचा अंदाज
दक्षिण मध्य महाराष्ट्र, घाट प्रदेश आणि दक्षिण कोकणातील काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईमध्ये दुपारी समुद्राला उधाण येणार, ४ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता
मुंबईमध्ये हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट
दुपारी समुद्राला उधाण येणार, ४ मीटर उंच लाटा
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार
Pune News: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा एकदा वाढवण्यात आला
पुणे: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा एकदा वाढवण्यात आलेला आहे
धरून क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणे भरून गेली आहेत
त्यामुळे खडकवासला धरणातून ३७०० क्युसेक्स वेगाने पाणी मुठा नदीत सोडण्यात आले आहे .
दिवसभरात पावसाजोर वाढल्यास प्रवाह आणखीन वाढवण्यात येणार
Nanded News: नांदेड शहरात पहाटे 4 वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी
नांदेड शहरात पहाटे 4 वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने कालच नांदेडसाठी ऑरेंज अलर्ट घोषित केलेला होता. याच अलर्ट चे अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत निघाला आहे. शहरातील नाल्या ओसंडून वाहत आहेत.
Rain Update: राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळदार पावसाचा अंदाज
राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळदार पावसाचा अंदाज
Mumbai Rain : मुंबईत सकाळपासून पावसाची जोरदार हजेरी
मुंबईत सकाळपासून पावसाची जोरदार हजेरी
विजांच्या गडगडाटासह पावसाची संततधार
मुंबईत सर्वत्र काळोख
Dharashiv Rain Alert: धाराशिव जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळांना आज सुट्टी जाहीर
हवामान विभागाकडून दिलेल्या ऑरेंज अलर्टनुसार धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळांना आज शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी याबाबत माहिती दिली आहे.
हवामान विभागाकडून 27 सप्टेंबर रोजी धाराशिव जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, संभाव्य मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या/सर्व माध्यमाच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Dharasiv rain : धाराशिव जिल्ह्यात रात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला
धाराशिव जिल्ह्यात रात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला
धाराशिव जिल्ह्यातील भुम, परंडा, कळंब, धाराशिव, लोहारा, उमरगासह सर्वच भागात पावसाची हजेरी
भुम तालुक्यातील अंबी येथील नदीला पुर, गावातील अंबिका देवी मंदिराच्या पायऱ्या पाण्यात
कळंब तालुक्यातील संजीतपुर येथील तेरणा नदीला पूर, सोयाबीन पिक पुर्णपणे पाण्याखाली,
Hingoli Rain: हिंगोली जिल्ह्यात रात्रीपासून मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस
हिंगोली जिल्ह्यात रात्रीपासून मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस
पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीचं पुन्हा नुकसान होण्याची शक्यता..
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावातील ओढ्याला पूर
ओढ्याला आलेल्या पुराच पाणी शिरल गावात, गावातील रस्त्यांना नदीचे स्वरूप
Thane Rain Update: ठाणे शहरामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी
ठाणे शहरामध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाची हजेरी
मुसळधार पाऊससोबत विजांचा गडगडाट आणि सोसाट्याचा वारा
मुसळधार पावसामुळे ठाणे शहरातील काही भागात पाणी साचण्याची शक्यता
Latur Rain Update: लातूर जिल्ह्यासाठी शाळांना सुट्टी जाहीर
हवामान खात्याने लातूर जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विना अनुदानिक शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालय, खाजगी शिकवणी तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थाना आज सुट्टी जाहीर केली आहे.