'लोक विकास' उपक्रमामार्फत धारावीकरांची कल्याणकारी सरकारी योजनांअंतर्गत नोंदणी

19 ऑक्टोबर आणि 16 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या दोन 'लोक विकास' कार्यक्रमांतून 197 व्यक्तींनी नावनोंदणी केली असून यातील काहींना अनेक योजनांचा लाभ मिळाला.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

धारावी सोशल मिशनच्या (DSM) 'लोक विकास' या उपक्रमाद्वारे धारावीतील 300 हून अधिक रहिवाशांची महत्वाच्या सरकारी कल्याणकारी योजनांअंतर्गत नोंदणी झाली आहे. 19 ऑक्टोबर आणि 16 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या दोन 'लोक विकास' कार्यक्रमांतून 197 व्यक्तींनी नावनोंदणी केली असून यातील काहींना अनेक योजनांचा लाभ मिळाला. परिसरातील तीनशेहून अधिक कुटुंबांना या उपक्रमाने या आधीच 10 कोटी रुपयांचा (अंदाजे) वैद्यकीय विमा लाभ मिळवून दिला आहे.

नक्की वाचा : धारावीतील सर्वेक्षणासाठी ड्रोन, लायडार, डिजिटल साधनांचा वापर

जेथे बहुसंख्य लोक असंघटित क्षेत्रात काम करतात, त्या भागात आयुष्मान भारत, ई-श्रम कार्ड आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यासारखे कल्याणकारी कार्यक्रम अत्यंत आवश्यक असलेली आर्थिक आणि आरोग्य सुरक्षा प्रदान करतात. तथापि, जागरूकतेचा अभाव आणि सायबर गुन्ह्यांबद्दलची भीती यासारखी आव्हाने अनेकदा रहिवाशांना हे लाभ मिळवण्यापासून वंचित ठेवतात.

Advertisement

नक्की वाचा : धारावीत झोपड्यांच्या सर्वेक्षणांचं काम वेगात, 25 हजारहून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण

उमेश सोनार या सहभागी झालेल्या व्यक्तीने, ते स्वतः आणि त्यांची पत्नी पुष्पा यांच्यासाठी, लोक विकासने आयुष्मान भारतमध्ये नोंदणी प्रक्रिया कशी सुलभ केली याबाबत सांगितले. “अगोदर आम्ही आधारचा गैरवापर होण्याची भीती आणि सायबर गुन्ह्यांबाबतची चिंता यामुळे नोंदणी करण्यास घाबरत होतो. मात्र 'डीएसएम'च्या मदतीमुळे आम्हाला सुरक्षित वाटले आणि याबाबतचा आत्मविश्वासही वाढला.” या कार्यक्रमाचा प्रभाव फक्त नावनोंदणीपुरता मर्यादित नसून त्याही पलीकडे पोहचला आहे. अनेकांना हा कार्यक्रम आवश्यक सामाजिक संरक्षणासाठी जीवनरेखा वाटू लागला आहे. “मी ई-श्रम कार्ड योजनेत नाव नोंदवले आणि प्रक्रिया सुरळीत वाटू लागली. बऱ्याच लोकांना या फायद्यांबद्दल माहिती नसते, परंतु आम्ही चुकू नये हे 'लोक विकास' सुनिश्चित करतो,” असे स्वयंपाकी असलेल्या 48 वर्षीय सिलारबी शेख म्हणाल्या.

Advertisement

धारावी सोशल मिशनचा सर्वसमावेशक दृष्टिकोन रहिवाशांना भेडसावणाऱ्या अडथळ्यांना दूर करून, कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये नावनोंदणी करण्यासाठी मोफत, सुरक्षित सहाय्य देऊ करतो. सामाजिक कार्यकर्त्या भाग्यलक्ष्मी यांनी त्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्या म्हणाल्या, “अनेक लोकांसाठी या योजना म्हणजे सुरक्षा जाळ्या आहेत. त्यातून कोणीही मागे राहणार नाही याची डीएसएम काळजी घेत आहे."

Advertisement
Topics mentioned in this article