धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या केंद्रस्थानी असलेले एक महत्त्वाचे काम म्हणजे सर्वेक्षण. या महत्त्वाकांक्षी योजनेच्या जलद आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी हे एकच सर्वात किचकट पाऊल आहे, त्याचा उद्देश धारावीला आधुनिक, राहण्यायोग्य समुदायात बदलणे आणि एकही रहिवासी विस्थापित होणार नाही याची खात्री करणे आहे. अचूक आणि सर्वसमावेशक सर्वेक्षणाशिवाय, या प्रकारचा आणि विशालतेचा प्रकल्प पुढे जाऊ शकत नाही.
सर्वेक्षण हे एक जटिल काम असून त्यासाठी सूक्ष्म प्रयत्न आणि समन्वय आवश्यक आहे. याची सुरुवात नेमकी जमीन शोधणाऱ्या संघांपासून होते, त्यानंतर झोपड्यांच्या संख्येचे संकलन येते. मग प्रगत अशा लायडार मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण क्षेत्राचा लेआउट चित्रित केला जातो. एकदा आधारभूत नकाशा प्रमाणित झाल्यानंतर, सर्वात गंभीर टप्पा सुरू होतो: तो म्हणजे घरोघरी पडताळणी. प्रत्येक सदनिकेला पूर्वनिर्धारित प्रणालीवर आधारित एक अद्वितीय ओळख कोड देण्यात येतो.
(नक्की वाचा- धारावी प्रकल्पाचे सत्य बाहेर आले, पवारांनी गांधी-ठाकरेंना उघडे पाडले!)
"धारावीतील पाच सेक्टर आणि 34 झोनमध्ये या सर्वेक्षणासाठी दररोज 50 हून अधिक चमू तैनात केले जातात," अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्प- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (DRP-SRA) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने, नाव ना सांगण्याच्या अटीवर दिली. ते म्हणाले, “दिवसाला,सरासरी 300 ते 400 झोपड्यांची गणना करण्यात येत असून 200 ते 250 घरांची पडताळणी केली जात आहे. दोन निवडणुका आणि प्रदीर्घ पावसाळ्यासारखी मोठी आव्हाने असूनही, या वर्षी मार्चच्या मध्यापासून 25,000 हून अधिक झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे आणि 60,000 हून अधिक झोपड्यांची गणना निश्चित करण्यात आली आहे. ही कामगिरी सर्वेक्षण करणाऱ्या चमूंचे अथक समर्पण दर्शवते.”
(नक्की वाचा- 'मोठ्या घरात राहणाऱ्यांना गरिबांच्या वेदना काय कळणार?' धारावी प्रोजेक्टवर CM शिंदेंचं उत्तर)
मात्र हा प्रवास संपण्यास अजून बराच दूर आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प- झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील (DRP-SRA) एका सूत्रानुसार, राज्य सरकार धारावीच्या रहिवाशांच्या पात्रता आणि अपात्रतेबाबत अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अजूनही मोठ्या संख्येने झोपड्यांचे सर्वेक्षण करावे लागणार आहे. “सर्वेक्षण ही केवळ नोकरशाहीची औपचारिकता नाही,” असे या सूत्रांनी सांगितले. “धारावीतील प्रत्येक रहिवाशासाठी उत्तम जीवन जगण्याचे ते प्रवेशद्वार आहे. सर्वेक्षक चमूंना सहकार्य करून, धारावीकर अशा पुनर्विकास प्रक्रियेत त्यांचा समावेश निश्चित करू शकतात, जी आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन घरांसाठी पात्रतेची हमी देते. सर्वेक्षण पूर्ण होण्यासाठी धारावीकरांनी एक पाऊल पुढे टाकणे आणि सक्रियपणे सहभाग घेणे आवश्यक आहे.”
(नक्की वाचा- 'राहुल गांधींना चुकीची माहिती दिली', 'त्या' आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांचं धारावीकरांना आवाहन, Video)
आशियातील सर्वात मोठा असलेलया या झोपडपट्टी सर्वेक्षण उपक्रमाला गति देण्यासाठी अतिरिक्त चमू लवकरच तैनात केले जाणार आहेत. धारावीकरांना खासगी स्वयंपाकघर, शौचालये, अखंड पाणी आणि वीज व आरोग्यदायी, हिरवेगार वातावरण प्रदान करणे हे पुनर्विकास प्रकल्पाचे ध्येय आहे. विस्तीर्ण रस्ते, मोकळ्या जागा, आधुनिक आरोग्य सुविधा आणि उत्तम पायाभूत सुविधा हे सर्व या बृह्दचित्राचा भाग आहेत - आणि या सगळ्याची सुरुवात सर्वेक्षणापासून होते.
“राजकीय हस्तक्षेप आणि व्यक्तिगत स्वार्थ यासारख्या अडथळ्यांमुळे प्रगतीला विलंब होण्याची भीती वारंवार निर्माण होत असताना, धारावीकरांची सामूहिक इच्छाशक्ती या आव्हानांवर मात करू शकते. सर्वसाधारणपणे धारावीच्या रहिवाशांनी सर्वेक्षण पथकांना सहकार्य केले आहे, परंतु आम्हाला आणखी मोठ्या सहकार्याची आणि अधिक सक्रिय दृष्टिकोन राखण्याची अपेक्षा आहे. सर्वेक्षण लवकर पूर्ण होण्याने परिवर्तनाच्या प्रवासाची सुरुवात होईल,” असेही या सूत्रांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world