राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
प्रेमी युगुलांसाठी स्वतंत्र बागांची सोय करावी अशी मागणी पुण्यातील काही संस्थांकडून केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या संस्था स्वतंत्र बागा मिळाव्यात यासाठी पाठपुरावा करीत आहेत. देशातील प्रत्येक व्यक्तीला धर्म, वर्ग, वर्ण, जातीच्या पलीकडे प्रेम करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे युगुलांना एकमेकांसोबत वेळ घालविण्यासाठी स्वतंत्र बागा उपलब्ध केल्या जाव्यात अशी मागणी यावेळी केली जाते.
आता पुण्यातील राईट फॉर लव्ह (Right For Love) नावाची संघटना यासाठी पुढे सरसावली आहे. वकिलांकडून चालवल्या जाणाऱ्या या संघटनेने पुण्यातील युगुलांना किमान सहा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सहा बागा संरक्षित करण्याची मागणी केली आहे.
नक्की वाचा - पुण्यातल्या मुलाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं Blue Whale Challenge काय आहे? या खेळात स्पर्धक जीव का देतात?
प्रेमात पडलेल्या मंडळींच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. पुण्यात एक राईट फॉर लव्ह नावाची संघटना आहे. वकील मंडळी ही संघटना चालवतात. ही संघटना महाराष्ट्रभरातल्या आंतरजातीय आंतरधर्मीय, प्रेमात पडलेल्या मंडळींना सर्वोतोपरी, कायदेशीर मदत करतात. या वकील मंडळींनी एनडीटीव्हीला राज्य सरकारचं एक परिपत्रक दाखवलं आहे. ज्यानुसार प्रेमात पडलेल्या मंडळींची संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. पुण्यात प्रेमी युगुलांसाठी किमान सहा आणि पिंपरीमध्ये सहा बागा संरक्षित कराव्यात अशी, मागणी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world