Right Way To Eat Rice: भारतीय आहारात भाताला (Rice) अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि अनेक पारंपरिक जेवण भाताशिवाय अपूर्ण वाटतात. भात शरीराला ऊर्जा आणि आवश्यक पोषणतत्त्वे देतो, यात शंका नाही. मात्र, भात खाण्याची एक योग्य पद्धत असते. अनेक लोक भात कोणत्याही वेळी खातात, ज्यामुळे त्याचे पूर्ण फायदे शरीराला मिळत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, भात खाण्याच्या योग्य पद्धतीमुळे वजन कमी (Weight Loss) करण्यासह आरोग्याला अनेक लाभ मिळतात. न्यूट्रिशनिस्ट डॉ. शालिनी सिंह सालुंके यांनी भात खाण्याचे 3 महत्त्वाचे आणि योग्य मार्ग सांगितले आहेत, ज्यामुळे तुमचे आरोग्य उत्तम राहते आणि वजनही नियंत्रणात राहते.
भात खाण्याची योग्य पद्धत आणि आरोग्य फायदे
डॉ. शालिनी सिंह सालुंके यांनी सांगितलं, भाताचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते, परंतु ते योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. भात योग्य प्रकारे खाल्ल्यास वजन आणि रक्तातील साखर (Blood Sugar) वाढण्याचा धोका कमी होतो, असे डॉ. शालिनी यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
1. भाताचे प्रमाण नियंत्रित ठेवा (Portion Control)
एकाच वेळी जास्त भात खाण्याऐवजी त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवा. 1 कप भात (भात शिजवल्यानंतरचे प्रमाण) इतके सेवन पुरेसे आहे. भाताचे प्रमाण (Quantity) नियंत्रित करण्यासाठी एक लहान वाटी (Small Bowl) वापरणे हा एक सोपा मार्ग आहे. या साध्या कृतीमुळे तुम्ही कॅलरीचे प्रमाण संतुलित ठेवू शकता.
( नक्की वाचा : Healthy Diet: एका दिवसात किती शेंगदाणे खावे? कुणी अजिबात खाऊ नये? फायदे, तोटे आणि 17 प्रश्नांची उत्तरं (FAQ) )
2. प्रोटीन आणि फायबरचा समावेश करा (Balance with Protein and Fiber)
कधीही फक्त भात खाऊ नये. तो नेहमी पुरेशा प्रमाणात किंवा त्याहून अधिक प्रमाणात फायबरयुक्त भाज्या (High Fiber Vegetables), डाळी (Lentils) किंवा योग्य प्रमाणातील प्रोटीन स्रोतांसोबत (Lean Protein Sources) खावा.
भात आणि प्रोटीन-फायबर यांचे हे संतुलित संयोजन (Balanced Combination) पचनक्रिया (Digestion) मंद करते, तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते आणि रक्तातील साखर अचानक वाढण्यापासून (Blood Sugar Spike) रोखते.
3. भातापूर्वी सॅलड खा (Eat Salad Before Rice)
तुम्हाला जास्त भात खाण्याची काळजी वाटत असेल, तर भात घेण्यापूर्वी सॅलड किंवा भाज्या (Vegetables) आणि प्रोटीन (Protein) चे सेवन करा. भात खाण्यापूर्वी सॅलड खाल्ल्यास शरीराला अतिरिक्त ऊर्जा मिळते आणि पचनास मदत होते. सॅलडमधील फायबरमुळे पोट भरल्याची भावना येते आणि आपोआप भाताचे सेवन कमी होते.
( नक्की वाचा : Shower Therapy : रोज रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ केल्याने त्वचेसह मानसिक आरोग्याला मिळतात 4 जबरदस्त फायदे )
देशी तूप (Ghee) वापरा!
डॉ. शालिनी यांनी सांगितलं की, तुम्हाला भात खाण्याची इच्छा असेल तर तो नेहमी देसी तुपासोबत (Desi Ghee) खावे. देसी तुपामुळे पचन सुधारते (Improves Digestion). तसेच, ते रक्तातील साखर नियंत्रित (Controls Blood Sugar) ठेवण्यास मदत करते.
या प्रकारे भात आहारातून पूर्णपणे वगळण्याऐवजी, त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवून आणि तो प्रोटीन-फायबर समृद्ध पदार्थांसोबत संतुलित करून तुम्ही भाताचा आनंद घेऊ शकता, ज्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रवासात मदतच होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world