LPG Cylinder Price Hike: महागाईचा भडका! व्यावसायिक सिलेंडर 115 रुपयांनी महाग; घरगुती गॅस दरातही मोठी वाढ

LPG Price Hike Today: देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ झाली असून मुंबईत नवीन दर 912.50 रुपये झाला आहे. व्यावसायिक सिलेंडरमध्ये 115 रुपयांची वाढ झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागली आहे. शनिवार, 7 मार्च 2026 पासून घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या 14.2 किलो सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची, तर व्यावसायिक 19 किलो सिलेंडरच्या किमतीत 115 रुपयांची वाढ झाली आहे.

नवीन दरांनुसार, 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरसाठी आता ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. एप्रिल 2025 पासून स्थिर असलेले गॅसचे दर आता थेट 60 रुपयांनी वधारले आहेत.

प्रमुख शहरांमधील घरगुती सिलेंडरचे नवीन दर 

मुंबई 
जुने दर- 852.50 
नवीन दर - 912.50 

दिल्ली 
जुने दर- 853 
नवीन दर - 913

कोलकाता
जुने दर- 879
नवीन दर - 939

चेन्नई
जुने दर- 868.50 
नवीन दर - 928.50 

(नक्की वाचा-  Shivneri Bus: मुंबई-पुण्यानंतर राज्यभर धावणार 'शिवनेरी'! 'या' 8 नवीन मार्गांवर सुरू होणार सेवा)

व्यावसायिक सिलेंडरही महाग

हॉटेल, रेस्टॉरंट आणि लहान व्यावसायिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 115 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचे दर 1720.50 रुपयांवरून 1835 रुपये रुपयांवर पोहोचले आहेत. या वाढीमुळे हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इंधन तुटवड्याच्या अफवांवर सरकारचे स्पष्टीकरण

दरवाढीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या. यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने स्पष्टीकरण दिले आहे. देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. पुरवठा साखळी सुरळीत सुरू आहे. भारताकडे कच्चे तेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. अमेरिकेकडूनही एलपीजीची आयात सुरू झाली आहे. नागरिकांनी घाबरून पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Vasai News: नागरिकांच्या जीवाशी खेळ! भाजप नगरसेवकांची वसई पालिकेच्या रुग्णालयावर धाड, धक्कादायक वास्तव उघड)

रशिया आणि अमेरिकेकडून आयात

भारताने गेल्या काही वर्षांत तेल आयातीचे स्रोत बदलले आहेत. फेब्रुवारीमध्ये भारताने आपल्या एकूण गरजेच्या 20 टक्के तेल रशियाकडून आयात केले आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या करारानुसार, अमेरिकेतून दरवर्षी 2.2 दशलक्ष टन एलपीजी आयात करण्यास सुरुवात झाली आहे.