
Metro Job : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MAHA-Metro) ने नागपूर आणि पुणे मेट्रो प्रकल्पांसाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची भरती काढली आहे. विविध पदांसाठी ही भरती असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2025 आहे. हे उमेदवार 5 वर्षांच्या करारावर किंवा प्रतिनियुक्तीवर नियुक्त केले जातील. ही भरती प्रक्रिया नागपूर मेट्रो रेल प्रकल्प, पुणे मेट्रो रेल प्रकल्प, ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल प्रकल्प आणि नवी मुंबई मेट्रो लाईन-1 च्या कामासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची गरज पूर्ण करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
महा-मेट्रोच्या कोणत्या विभागांमध्ये भरती?
चीफ प्रोजेक्ट मॅनेजर (सिग्नलिंग) : नागपूर मेट्रोसाठी 1 जागा
- पगार - 1,20,000-2,80,000 रुपये
- शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये बी.ई./बी.टेक.. 19 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
डेप्युटी जनरल मॅनेजर (लँड मॉनेटायझेशन) : नागपूर मेट्रोसाठी 1 जागा
- पगार - 70,000-2,00,000 रुपये
- शैक्षणिक पात्रता- एमबीए (फायनान्स). मेट्रो प्रकल्पांमधील मालमत्ता विकास आणि महसूल वाढीचा 7 वर्षांचा अनुभव.
डेप्युटी जनरल मॅनेजर (सेफ्टी & ट्रेनिंग) : पुणे मेट्रोसाठी 1 जागा
- पगार -70,000-2,00,000 रुपये
- शैक्षणिक पात्रता- मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/टेलिकम्युनिकेशनमध्ये बी.ई./बी.टेक.. 7 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
डेप्युटी जनरल मॅनेजर (E&M) -: नागपूर मेट्रोसाठी 1 जागा
- पगार - 70,000-2,00,000 रुपये
- शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.ई./बी.टेक. 7 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
सेक्शन इंजिनिअर (E&M) : नागपूरसाठी 4 आणि पुणेसाठी 4 अशा एकूण 8 जागा
- पगार - 40,000-1,25,000 रुपये
- शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.ई./बी.टेक. 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
सेक्शन इंजिनिअर (सिग्नलिंग) : नागपूरसाठी 3 आणि पुणेसाठी 3 अशा एकूण 6 जागा
- पगार - 40,000-1,25,000 रुपये
- शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये बी.ई./बी.टेक. 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
सेक्शन इंजिनिअर (टेलिकम्युनिकेशन आणि AFC) : नागपूरसाठी 3 आणि पुणेसाठी 3 अशा एकूण 6 जागा
- पगार - 40,000-1,25,000 रुपये
- शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये बी.ई./बी.टेक. 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
सेक्शन इंजिनिअर (पॉवर सप्लाय) : नागपूरसाठी 2 आणि पुणेसाठी 2 अशा एकूण 4 जागा
- पगार - 40,000-1,25,000 रुपये
- शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.ई./बी.टेक. 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
सेक्शन इंजिनिअर (OHE/TRD) : नागपूरसाठी 2 आणि पुणेसाठी 2 अशा एकूण 4 जागा
- पगार - 40,000-1,25,000 रुपये
- शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.ई./बी.टेक. 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
सेक्शन इंजिनिअर (IT) : नागपूरसाठी 1 जागा
- पगार - 40,000-1,25,000 रुपये
- शैक्षणिक पात्रता- कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये बी.ई./बी.टेक. 3 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
अर्ज शुल्क
- SC, ST आणि महिला उमेदवारांसाठी 100 रुपये.
- UR आणि OBC (माजी सैनिकांसह) उमेदवारांसाठी 400 रुपये.
- शुल्क 'Maharashtra Metro Rail Corporation Limited' च्या नावाने काढलेल्या डिमांड ड्राफ्टद्वारे किंवा UPI ॲपद्वारे ऑनलाइन पेमेंट करून भरता येईल.
- भरलेला अर्ज आणि सर्व कागदपत्रे 10 ऑक्टोबर 2025 पूर्वी खालील पत्त्यावर स्पीड पोस्टने पाठवावीत, (General Manager (HR), Maharashtra Metro Rail Corporation Ltd., Metro Bhawan, Near Dikshabhoomi, NAGPUR-440 010)
- अर्जामध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात आणि जाहिरात क्रमांक (Advertisement Number) स्पष्टपणे नमूद करावा.
निवड प्रक्रिया कशी असेल?
- वैयक्तिक मुलाखत (Personal Interview): उमेदवारांच्या पात्रता आणि अनुभवाच्या आधारे त्यांची मुलाखतीसाठी निवड केली जाईल.
- कागदपत्रांची पडताळणी (Document Verification): मुलाखतीनंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.
- वैद्यकीय तपासणी (Medical Examination): निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी महा-मेट्रोच्या अधिकृत हॉस्पिटलमध्ये होईल.
- निवड झालेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवले जाईल आणि पुढील सूचना महा-मेट्रोच्या वेबसाइटवर वेळोवेळी जाहीर केल्या जातील.
सविस्तर माहितीसाठी महामेट्रो नोकरी या लिंकवर क्लिक करा.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world