Maharashtra Assembly Session 2025: चिटफंड, दामदुप्पट योजनेत पोलीसही करतायत गुंतवणूक, गृहमंत्री म्हणतात...

सिस्का LED कंपनीच्या संचालकांनी पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा मुद्दा नाना पटोले यांना सभागृहात उपस्थित केला. याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Maharashtra Assembly Session 2025:  विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनच्या दुसऱ्याच दिवसी काँग्रेस आमदार नाना पटोले यांचं एका दिवसासाठी निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षांच्या समोर असलेल्या राजदंडाला हात लावल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्याआधी सिस्का LED कंपनीच्या संचालकांनी पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा मुद्दा नाना पटोले यांना सभागृहात उपस्थित केला. याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. 

"सिस्का एलईडीसारख्या अनेक कंपन्या आहेत. अध्यक्ष महाराज तुमच्या मतदारसंघातही अशा कंपन्या आहेत. सिस्का LED कंपनीच्या संचालकांनी पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केली" असा आरोप नाना पटोले यांनी केला. 

(नक्की वाचा-  Nana Patole Suspended: सभागृहात हायहोल्टेज ड्रामा! दुसऱ्याच दिवशी नाना पटोले निलंबित)

यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना म्हटलं की, "नानाभाऊ दिल्लीला होते, त्यामुळे त्यांचा नीट अभ्यास झालेला नाही. सिस्का कंपनीचा प्रत्यक्षात काही संबंध नाही. एकाने दुसऱ्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे. पेपरमधील बातमीच्या आधारे प्रश्न तयार केले जातात. एका व्यक्तीने माजी संचालक असल्याचे सांगून केलेले हे कांड आहे." 

Advertisement

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर नाना पटोले यांनी पुन्हा म्हटलं की, "चिटफंड कंपन्यांनी पोलिसांनाही फसवलं आहे. रिझर्व्ह बँकेचे नियम आहे की व्याज किती द्यायचं. मात्र तरीही लुटालुटीचे काम सुरू आहे. व्याजदर वाढवून जिथे प्रकरणे आहेत तिथे पोलीस कारवाई का करत नाही? पोलीसच पैसे त्यात गुंतवतात. कोट्यवधींची लूट होते गरीबांची. कंपनी उघडल्या उघडल्या ती बंद व्हायला हवी." 

Advertisement

(नक्की वाचा-  Raj - Uddhav Thackeray : वाजत गाजत या, गुलाल उधळत या! राज आणि उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आमंत्रण)

यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की, पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. आमिषे दाखवणाऱ्या कंपन्या, पॉन्झी स्कीम चालवणाऱ्या कंपन्यांविरोधात जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. कंपनी सुरू झाल्या झाल्या ती पोलिसांना कळत नाही. कारण ती कंपनी रजिस्ट्रेशन अॅक्टनुसार नोंदणी होते. त्यासाठी पोलिसांची परवागी घ्यावी लागत नाही. मात्र फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिटही सुरू केलंय. हे पथक अधिकचा नफा देण्याचे आमीष दाखवणाऱ्या जाहिरातींच्या आधारे ट्रॅक केले जाते. अनेक कंपन्या रजिस्ट्रेशन करत नाही, कोणाची परवानगी घेत नाही, थेट बोर्ड लावतात. लोकांकडून पैसे घेऊन सुरूवातीला व्याज देतात, मात्र नंतर गायब होतात. कोणीही अधिकचे व्याजदर देण्याची हमी देत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका, असं आवाहन देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं. 

Advertisement