Maharashtra Assembly Session : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या सातव्या दिवशी विरोधी पक्षातील नेते सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक दिसले. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पायऱ्यांवर बसून सभागृहात जाणाऱ्या सत्ताधारी पक्षातील एकएका नेत्याला टार्गेट केले. प्रत्येक नेत्या येईल त्यावेळी विरोधकांना वेगवेगळ्या मुद्यावरून घोषणाबाजी केली.
महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे पायऱ्यांवर जात असताना विरोधकांकडून 'कोंबडी चोरांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय' अशी घोषणाबाजी करण्यात आली. तर आदित्य ठाकरे यांच्याकडून चायनीज बिल्ली असा उल्लेख करण्यात आला.
विधान परिषद उपसभापती नीलम गोरे विधानभवन पायऱ्यांवर जात असताना आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून 'मर्सिडीस'च्या घोषणा देण्यात आल्या. यावेली नीलम गोरे यांच्या चेहऱ्यावरून राग व्यक्त होत आहे. त्या काहीशा थांबून मागे वळून सर्वांकडे रागाने पाहत होत्या.
भरत गोगावले पायऱ्यांवर आल्यावर विरोधकांकडून 'ओम भट स्वाहा'च्या घोषणा देण्यात आल्या. तर आदित्य ठाकरेंनी भरात गोगावलेंची टॉवेल लावण्याची नक्कल केली.
मंत्री संजय शिरसाठ विधानभवन पायऱ्यांजवळ आल्या आल्या शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंकडून 50 खोके एकदम ओके, भ्रष्टाचारी सरकार अशा केल्या घोषणा देण्यात आल्या. तर माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर पायऱ्यांवरून जात असताना शाळेचे युनिफॉर्म गेले कुठे... गुजरातला अशा घोषणा दिल्या गेल्या.