'फुटबॉल क्लब'च्या नावाखाली तरुणांचे ब्रेनवॉशिंग; ATS च्या यवतमाळ-अहिल्यानगर छापेमारी धक्कादायक वास्तव उघड

Maharashtra ATS: महाराष्ट्र एटीएसने 21 ठिकाणी छापे टाकून फुटबॉल क्लबच्या नावाखाली चालणाऱ्या कट्टरतावादी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. तरुणांना खेळाच्या बहाण्याने केरळ आणि बंगालमधील कट्टरतावादी छावण्यांमध्ये पाठवले जात होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) 'व्हॅलेंटाईन डे'च्या मुहूर्तावर राज्यात एक मोठी कारवाई करत देशविरोधी कारस्थानाचा पर्दाफाश केला आहे. यवतमाळ आणि अहिल्यानगर (नगर) जिल्ह्यांत टाकलेल्या छाप्यांमधून फुटबॉल क्लबच्या आड चालणाऱ्या एका 'कट्टरतावादी' रॅकेटचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) 14 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून राबवलेल्या विशेष मोहिमेत एका मोठ्या 'रॅडिकलायझेशन नेटवर्क'चा उलगडा केला आहे. यवतमाळमधील पुसद आणि अहिल्यानगरसह राज्यात एकूण 21 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. फुटबॉल क्लबच्या नावाखाली तरुणांना कट्टरतावादी विचारधारेकडे वळवण्याचे हे गंभीर कारस्थान एटीएसने हाणून पाडले आहे.

(नक्की वाचा-  Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)

नागपुरातील 'किराणा व्यावसायिक' मुख्य सूत्रधार

या रॅकेटचा मुख्य सूत्रधार नागपुरातील एक किराणा व्यावसायिक असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा व्यक्ती मूळचा पुसदचा असून सध्या नागपूरच्या जाफर नगर भागात राहतो. हा सूत्रधार पुसद येथील एका फुटबॉल क्लबच्या माध्यमातून तरुणांना एकत्र करायचा. तरुणांना फुटबॉल खेळाडू असल्याचे भासवून त्यांना प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली केरळ आणि पश्चिम बंगालमधील कट्टरतावादी छावण्या व कार्यशाळांमध्ये पाठवले जात होते. या तरुणांच्या प्रवासासाठी विमानाची महागडी तिकिटे काढली जात होती. यावरून या नेटवर्कला मोठा परदेशी किंवा संघटित आर्थिक पुरवठा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तपासात असे समोर आले आहे की, मुख्य संशयिताचे कुटुंब अनेक दशकांपासून कट्टरपंथी संघटनांशी जोडलेले आहे. त्याचे आई-वडील एका प्रतिबंधित इस्लामिक संघटनेचे सदस्य होते आणि या गुप्त कारवायांमध्ये त्यांनी सक्रिय मदत केल्याचा संशय आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Pune News: पुणेकरांवर येणार पाणी संकट! पुणे शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा, काय आहे प्रकरण?)

छापेमारीत जप्त केलेले साहित्य

पुसद आणि अहिल्यानगरमध्ये केलेल्या या कारवाईत एटीएसने अनेक तरुणांना ताब्यात घेतले आहे. सोबतच मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. सोशल मीडियावरील चॅट्स आणि 'डिलीट' केलेला डेटा पुन्हा मिळवण्यासाठी ही उपकरणे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली आहेत. हे तरुण इंटरनेटच्या माध्यमातून सीमेपलीकडील कट्टरपंथी संघटनांच्या संपर्कात असल्याचे आणि भारतविरोधी भावना भडकवणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे.

सध्या मुख्य संशयिताची चौकशी करून त्याला निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या नेटवर्कला नेमका निधी कोठून मिळतो आणि याचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठे जोडले आहेत, याचा शोध एटीएस घेत आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article