Dombivli News: 'त्या' दोन्ही धोकादायक इमारतीतील 50 रहिवाशांना इतरत्र हलवलं, रवींद्र चव्हाण लोकेशनवर गेले अन्..

दोन्ही इमारतीतील 50 रहिवाशांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. याप्रकरणी स्थानिक आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
High Risk Buildings In Dombivli

Dombivli High Risk Buildings Latest Update : मुसळधार पावसामुळे तिळक रोड परिसरात उभारण्यात येत असलेल्या कर्करोग रुग्णालयाच्या कामासाठी 40 फूट खोल खड्डा खोदला होता. यामुळे माती खचून दोन इमारतींची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली. या प्रकरणी इमारतीतील 50 रहिवाशांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

"तातडीनं आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात"

यावेळी त्यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.त्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्करोग रुग्णालयाच्या कंत्राटदारांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रकरणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. 

Advertisement

नक्की वाचा >> Flood Video: उल्हास नदीने ओलांडली धोक्याची पातळी, दहिवली पुलावरून पाणी, कर्जतमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला

"नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये"

जवळपासच्या इमारतींना कोणताही धोका निर्माण होऊ नये,नागरिकांच्या जीवाचे व मालमत्तेचे संरक्षण व्हावे.भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी युद्धपातळीवर संरक्षणात्मक कामे हाती घ्यावीत,असे निर्देश देण्यात आले.रवींद्र चव्हाण यांनी नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली. 

नक्की वाचा >> Raigad News: झेनिथ धबधब्यावर अडकलेल्या 100 हून अधिक पर्यटकांचे प्राण कसे वाचले? 7 मिनिटांचा थरारक व्हिडीओ बघा

परिसरातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे चव्हाण म्हणाले.यावेळी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल दामले,भाजप गटनेते शशिकांत कांबळे,भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब,नगरसेवक मंदार हळबे,भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे उपस्थित होते.