विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, आज बारावीचा निकाल; कुठे पाहता येईल?

आज दुपारी एक वाजेपासून ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

अखेर विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज 21 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. बारावीच्या परीक्षेसाठी यंदा पंधरा हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 1 फेब्रुवारी ते 19 मार्च या कालावधीत घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर होणार आहे. यंदाच्या वर्षी बारावीचा निकाल लवकर लागणार असे संकेत देखील देण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने निकाल जाहीर करण्याचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले होते. आज दुपारी एक वाजेपासून ऑनलाईन पद्धतीने निकाल पाहता येणार आहे.

बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या  विभागांमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आली होती. आज याचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता याचा निकाल पाहता येणार आहे. काही दिवसांपूर्वी CBSC चा दहावी-बारावीचा निकाल समोर आला होता. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. 

नक्की वाचा - Job Vacancy: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हेलिकॉप्टर-MRO विभागात नोकरीची मोठी संधी

कुठे पाहता येईल?
आज दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल पाहता येणार आहे. हा निकाल mahresult.nic.in, http://hscresult.mkcl.org, www.mahahsscboard.in, https://results.digilocker.gov.in, http://results.targetpublications.org या संकेतस्थळावर पाहू शकता. आज निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून निकालाची छापील प्रत उपलब्ध होईल. 

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा...