जाहिरात
This Article is From May 08, 2024

Job Vacancy: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हेलिकॉप्टर-MRO विभागात नोकरीची मोठी संधी

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, हेलिकॉप्टर कॉम्प्लेक्स बंगळुरू (Helicopter Complex Bangalore) येथे हेलिकॉप्टर-एमआरओ विभागामध्ये नॉन-एक्झेक्युटिव्ह संवर्गात विमान तंत्रज्ञ (एअरफ्रेम) आणि विमान तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) ही पदे माजी सैनिकांसाठी नोकरीची संधी आहे.

Job Vacancy: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या हेलिकॉप्टर-MRO विभागात नोकरीची मोठी संधी

Hindustan Aeronautics Limited: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, हेलिकॉप्टर कॉम्प्लेक्स बंगळुरू (Helicopter Complex Bangalore) येथे हेलिकॉप्टर-एमआरओ विभागामध्ये नॉन-एक्झेक्युटिव्ह संवर्गात विमान तंत्रज्ञ (एअरफ्रेम) आणि विमान तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) ही पदे माजी सैनिकांसाठी चार वर्षाच्या कालावधीकरिता भरण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली आहे. 

(नक्की वाचा: आयुष्यात खूप त्रस्त आहात? समाधान मिळत नाहीय? जया किशोरींच्या प्रेरणादायी विचारामुळे बदलेल जीवन)

एकूण 23 पदांकरिता भरती

वेतनस्तर डी-6 मधील विमान तंत्रज्ञाची (Aeronautical Engineer)(एअरफ्रेम) 12 पदे आणि विमान तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) ही 11 पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवाराने विमान तंत्रज्ञ (एअरफ्रेम) या पदासाठी मेकॅनिकल अभियांत्रिकी पदविका किंवा समकक्ष तर विमान तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) या पदासाठी इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका किंवा समकक्ष शिक्षण पूर्ण केलेले असावे.

सशस्त्र दलामध्ये (Armed Forces) भरती होण्यापूर्वी मान्यताप्राप्त संस्थेची अभियांत्रिकी पदविका प्रणाली अंतर्गत पूर्णवेळेत पूर्ण केलेली असावी किंवा भारतीय वायुसेना, भारतीय स्थलसेना, भारतीय नौदलाद्वारे प्रदान केलेली संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदविका असावी. पदविका ही सशस्त्र दलामध्ये विहित प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि सशस्त्र दलांनी निर्दिष्ट केलेली आवश्यक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पुरस्कृत केलेली असावी. 

(नक्की वाचा: Mother's Day 2024: पहिल्यांदाच आई होताय? महिलांनो अशी घ्या शारीरिक-मानसिक आरोग्याची काळजी)

किती असेल वेतन?

  • निवडलेल्या उमेदवारांना वेतनस्तर डी-6 नुसार मूळ वेतन 23 हजार रूपये (23 Thousand Rupees), इतर भत्ते 34 हजार असे एकूण अंदाजे 57 हजार (Fifty Seven Thousand) मासिक वेतन मिळेल. 
  • नियमानुसार माजी सैनिक, अपंग माजी सैनिकांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल. 
  • निवडलेल्या उमेदवारांची देशातील विविध ठिकाणी एमआरओ विभागाच्या अंतर्गत जोधपूर, (राजस्थान), पोरबंदर (गुजरात), रत्नागिरी (महाराष्ट्र), शिक्रा-मुंबई, कोची (केरळ), पोर्ट ब्लेअर (अंदमान आणि निकोबार), चेन्नई (तामिळनाडू), देगा विझाग आणि मिसामारी (आसाम) यापैकी कोणत्याही एका तळावर बदली केली जाईल. बदलीच्या ठिकाणामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही. 

पुणे जिल्ह्यातील इच्छुक शैक्षणिक अर्हताधारक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दिनांक 10 मेपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल  हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.

(नक्की वाचा: Ayushman Bharat Yojanaमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा, कसा घ्यावा लाभ? जाणून घ्या सविस्तर)

NOTE : उच्च शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार नाहीत. निवड प्रक्रिया लेखी चाचणीद्वारे होईल. निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीसाठी दावा करता येणार नाही.

VIDEO : अचानक वाढलेल्या तापमानवाढीचं कारण काय? भविष्यात हा धोका किती वाढेल?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com