दहावीच्या निकालाची तारीख ठरली; कुठे पाहू शकता निकाल?

दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. याबाबत राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी माहिती दिली. 

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर झाला आहे. त्यानंतर आता राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च 2024 मध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी, 26 मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाइन निकाल पाहता येणार आहे. याबाबत राज्य मंडळाचे सचिव अनुराधा ओक यांनी माहिती दिली. 

आतापर्यंत जून महिन्यात दहावीचा निकाल जाहीर केला जात होता. मात्र यंदा मे महिन्यातच दहावीचा निकाल जाहीर केला जात आहे. गुणपडताळणी आणि छायाप्रत मिळविण्यासाठी 28 मे ते  11 जूनपर्यंत अर्ज करता येईल.  

नक्की वाचा - Mumbai Monsoon Update: मुंबईमध्ये मान्सून 10 जूनला होणार दाखल?

दरम्यान तुम्ही दहावीचा निकाल ऑनलाइन पाहू शकता. यासाठी दुपारी एक वाजता पुढील संकेतस्थळांना भेट द्या.

निकाल पाहण्यासाठी क्लिक करा...

Maharashtra 10th SSC Result 2024 Website Link 

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

https://results.targetpublications.org