जाहिरात
Story ProgressBack

Mumbai Monsoon Update: मुंबईमध्ये मान्सून 10 जूनला होणार दाखल? 

Mumbai Monsoon Update: मुंबईमध्ये मान्सून 10 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Read Time: 2 mins
Mumbai Monsoon Update: मुंबईमध्ये मान्सून 10 जूनला होणार दाखल? 

Mumbai Monsoon Update: उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. केरळमध्ये मान्सूनचे आगमन 31 मेदरम्यान तर मुंबईसह कोकणात 10 जूनपर्यंत होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यानंतर 15 जूनदरम्यान मान्सून कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा, विदर्भामध्ये दाखल होऊ शकतो.

(नक्की वाचा: मनमाडमध्ये पाणीसंकट गंभीर, 30 मेपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक) 

मुंबईत पाणीकपातीचा निर्णय

मान्सूनचा अंदाज जरी वर्तवण्यात आला असला तरी दुसरीकडे येत्या 30 मेपासून मुंबई महानगरामध्ये पाच टक्के तर 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यामध्ये घट झाल्याने खबरदारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.  

(नक्की वाचा: नाझरे धरणात शून्य पाणी साठा, पुरंदर बारामतीला फटका बसणार?)

भातसा धरणातून (Bhatsa Dam) 1 लाख 37 हजार दशलक्ष लिटर तर अप्पर वैतरणा धरणातून (Upper Vaitrana Dam) 91 हजार 130 दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीसाठा मुंबईला (Mumbai Water) मिळणार आहे. म्हणजे मुंबईसाठी पाणीसाठा उपलब्ध आहे. महत्त्वाचे म्हणजे यंदा मॉन्सूनचे वेळेवर आगमन होईल, असा अंदाजही हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवला आहे. तरीही अलीकडे वाढलेले तापमान, पर्यायाने वाढणारे बाष्पीभवन आणि पाणीसाठा (Water Storage) 10 टक्क्यांपेक्षा कमी झाल्यानंतर यापुढेही पाणीपुरवठा नियोजनपूर्वक करता यावा, असा सर्व बाबींचा विचार करून खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

(नक्की वाचा: संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळतंय, निवडणुका संपल्याने सरकारने आता त्याकडे लक्ष द्यावे : नाना पटोले)

VIDEO: दुष्काळाबाबत संभाजीनगरातून NDTV मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
बीडमधील शहरांचा दुरवस्था, मनसेचे सरण रचून आंदोलन
Mumbai Monsoon Update: मुंबईमध्ये मान्सून 10 जूनला होणार दाखल? 
congress leader Nana patole demand to help in drought area state government
Next Article
दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला तातडीने मदत द्या, नाना पटोले यांची मागणी
;