जाहिरात

Maharashtra Budget 2025 : अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार? अजित पवारही विक्रमाच्या वाटेवर

Maharashtra Budget 2025 : शेतकरी सन्मान योजनेत 3 हजार रुपयांची वाढ करण्याचे आधीच जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण बहिणींचे अनुदान 2100 रुपये करण्याचा निर्णय घेतला जातो का? याकडे महिला वर्गाचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Budget 2025 : अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळणार? अजित पवारही विक्रमाच्या वाटेवर
Budget 2025 ajit Pawar

Maharashtra Budget 2025 : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज (10 मार्च) राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महायुती सरकारचा हा सत्तास्थापनेनंतरचा पहिलाच अर्थसंकल्प आहे. तर अजित पवार 11 व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उपमुख्यमंत्री पवार हे आर्थिक शिस्तीचे कठोर प्रशासक म्हणून ओळखले जातात. जनमताची नाडी ओळखून अर्थसंकल्पात लोकाभिमुख निर्णय जाहीर करताना राज्याच्या विकासप्रक्रियेला धक्का बसणार नाही याची काळजी ते घेत असतात. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पातून राज्यातील नागरिकांना काय मिळणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. महायुतीला मिळालेल्या यशानंतर नवीन सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात शेतकरी, लाडक्या बहिणी व सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का? याचीच उत्सुकता लागली आहे. 

(ट्रेंडिंग बातमी- Ajit Pawar: सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प कुणी सादर केला? अजित पवारांचा नंबर कितवा?)

शेतकरी सन्मान योजनेत 3 हजार रुपयांची वाढ करण्याचे आधीच जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण बहिणींचे अनुदान 2100 रुपये करण्याचा निर्णय घेतला जातो का? याकडे महिला वर्गाचे लक्ष लागले आहे. लाडक्या बहिणींचे अनुदान 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने निवडणुकीपूर्वी दिले होते. याशिवाय ग्रामीण भागांत रस्त्यांचे काँक्रीटीकरण, सौरऊर्जेचा वापर करणाऱ्यांना सवलती देण्याचे सूतोवाचही करण्यात आले आहे. 

अजित पवार विक्रमाच्या वाटेवर

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या त्यांचा 11 वा अर्थसंकल्प सादर करतील. त्यानंतर ते शेषराव वानखेडे (13 वेळा) यांच्यानंतर दुसरे सर्वाधिक (11) वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरतील. जयंत पाटील (10 वेळा) आणि सुशीलकुमार शिंदे (9 वेळा) अर्थसंकल्प सादर केला आहे.

ट्रेंडिंग बातमी - Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या आई शेतात राहायला का गेल्या? टीकेनंतर मुंडेंचीच पोस्ट

कोविडच्या संकटकाळात अनेक राज्यांची अर्थव्यवस्था अडचणीत असताना उपमुख्यमंत्री पवार यांनी महाराष्ट्राची आर्थिक शिस्त बिघडू दिली नव्हती, त्याबद्दल त्यांच्या कार्याचा केंद्रीय पातळीवर गौरव झाला आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, दलित, आदिवासी, विद्यार्थी, युवक हे घटक त्यांच्या अर्थसंकल्पाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. कृषी, उद्योग, दळणवळण, आरोग्य, मनुष्यबळ विकास या पंचसूत्रीवर आधारीत अर्थसंकल्पही त्यांनी सादर केला आहे. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडूनही राज्यातील जनतेला अनेक अपेक्षा आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: