जाहिरात

Cabinet Decision : रेशन दुकानदारांसाठी खूशखबर; मार्जिनच्या दरात प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ

सध्या रेशन दुकानदारांना शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वाटप करण्यासाठी प्रति क्विंटल 150 रुपये मार्जिन मिळत होते.

Cabinet Decision : रेशन दुकानदारांसाठी खूशखबर; मार्जिनच्या दरात प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ

Mumbai News : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील रेशन दुकानदारांची मार्जिनमध्ये वाढ करण्याची मागणी अखेर मान्य झाली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत काम करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनच्या रकमेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. या निर्णयामुळे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य (शिधा) वाटप करणाऱ्या रेशन दुकानदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मार्जिनमध्ये वाढ किती?

सध्या रेशन दुकानदारांना शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वाटप करण्यासाठी प्रति क्विंटल 150 रुपये मार्जिन मिळत होते. आता या दरात प्रति क्विंटल 20 रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांना प्रति क्विंटल 170 मार्जिन मिळणार आहे.

(नक्की वाचा- Police Bharati News: राज्यात 14 हजार पदांसाठी पोलीस भरती; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय)

मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, रेशन दुकानदारांच्या या मागणीबाबत सरकार सकारात्मक होते आणि अनेक बैठकांमध्ये यावर चर्चा झाली होती. अखेर, आज मंत्रिमंडळाने ही मागणी मान्य करून मार्जिन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

(नक्की वाचा-  Political News : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नवनियुक्त 15 प्रवक्त्यांची यादी जाहीर, दोन नावांची जोरदार चर्चा)

सरकारवर आर्थिक भार

या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजे वार्षिक 92.71 कोटी रूपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. तरीही, सरकारने रेशन दुकानदारांच्या मागणीचा विचार करून हा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्था अधिक सुरळीत आणि कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा आहे. या निर्णयाचे राज्यातील रेशन दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत केले जात आहे, कारण यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com